Fitness Tips : रकुलप्रित सिंहसारखी हॉट फिगर हवीय? सकाळी उपाशी पोटी प्या ही कॉफी
Health Tips: बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. पण रकुलच्या या टोन्ड फिगरमागील गुपित माहितेय का? रकुलप्रित सिंह सकाळी व्यायाम करण्यापूर्वी नक्की कोणते पेय पिते याबद्दल जाणून घेऊया...
Body Toning: तुपाचे सेवन करण्याचे अगणित आरोग्यदायी फायदे आहेत.तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड सारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होणे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.आयुर्वेदात देखील तुपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
वजन कमी करताना बहुतांशजण तूप खाणे टाळतात. त्यांना वाटते तूप खाल्ल्याने वजन वाढले जाईल. पण तूप खाणे टाळण्याची चुक करू नये. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी, बी-12 ची कमतरता निर्माण होऊ लागते. तुपाचे सेवन विविध प्रकारे करता येते. पण तुपाचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहितेय का? जाणून घेऊया सविस्तर…
25
तुपाच्या कॉफीने करा दिवसाची सुरूवात
वजन कमी करायचे असल्यास योग्य डाएट आणि व्यायाम करू शकता. पण टोन्ड फिगरसाठी तुम्ही तुपाची कॉफी नक्की पिऊ शकता.अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या हॉट फिगरमुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहितेय का, रकुलच्या हॉट फिगर मागील गुपित? खरंतर रकुलप्रित सिंह सकाळी व्यायामापूर्वी तुपाची कॉफी पिते.यामुळेच रकुलची फिगर हॉट आणि टोन्ड आहे.
35
तुपयुक्त कॉफीचे फायदे
तुपाची कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते
शरीरातील हार्मोन्सचा स्तर समतोल सुधारतो
खाल्लेले पदार्थ पचण्यास मदत होते
शरीरातील अॅसिड कमी होते, कारण तुपात कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते
शरीराला येणारी सूज कमी होते
शरीरात गुड फॅट्स तयार होतात
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
वृद्धत्वाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते किंवा वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
Related Articles
45
अशी तयार करा तुपयुक्त कॉफी
तुपाची कॉफी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एक चमचा अथवा 5 ग्रॅम तूप घ्या.
आता एक कप गरम पाणी घेत सर्व सामग्री व्यवस्थितीत ढवळा.
तुपाची कॉफी दररोज सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे नक्कीच वजन कमी होईल. रकुलप्रितसह करीना कपूर खान, शिल्पा शेट्टीसह अनेक अभिनेत्री देखील आपल्या डेली रूटीनमध्ये या तुपाच्या कॉफीने सकाळची सुरूवात करतात.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.