थंडीमध्ये बहुतांश जणांना कोरड्या त्वचेचा समस्येचा सामना करावा लागतो.
त्वचा ड्राय होण्यामागे विविध कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे फार कमी प्रमाणात पाणी पिणे. कोरड्या त्वचेच्या समस्येवर उपाय म्हणून आपण काही नैसर्गिक उपाय करू शकता.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये, म्हणून केमिकलयुक्त फेसवॉश वापरणे टाळा.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर टोनर लावण्यास विसरू नका.यासाठी तांदळाचे पीठ, काकडीचा रस एकत्रित करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण, मृत पेशींची समस्या कमी होईल.
हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी सीरमचा वापर करावा.सीरममुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास व त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.
कोरफडीचा गर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कोरफडीच्या गराने त्वचेला हलक्या हाताने मसाज करावा यामुळे त्वचा मऊ राहील.
थंडीतही न विसरता सनस्क्रीन लावा. यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.
अननसामध्ये व्हिटॅमिन-सी व अँटी ऑक्सिडेंट्सचे गुणधर्म आहेत, हे पोषण तत्त्व त्वचेसाठी लाभदायक आहेत. यामुळे डाएटमध्ये या फळाचा समावेश करावा.
चॉकलेट फेस मास्क तयार करण्यासाठी कोको पावडर, मध आणि मक्याचे पीठ एकत्रित मिक्स करून पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवा व नंतर थंड पाण्याचे चेहरा स्वच्छ करावा.
त्वचेसाठी नारळाचे तेल अतिशय लाभदायक मानले जाते. योग्य प्रमाणात व योग्य रित्या या तेलाने मसाज केल्यास कोरड त्वचेची समस्या कमी होऊ शकते.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.