काय सांगता! दुबईतील रेस्टॉरंटमध्ये मिळते 24 कॅरेट सोन्याची 'तडका दाल', नेटकऱ्यांनी VIDEO व्हायरल झाल्यानंतर दिल्यात अशा प्रतिक्रिया

सोशल मीडियावर दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये 24 कॅरेट सोन्याची तडका दालचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

24-Carat Gold Dal Tadka Viral Video : सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्रार (Ranveer Brar) यांचे दुबईतील पहिले रेस्टॉरंट ‘कश्कन’ मधील एक खास डिश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका लाकडाच्या बॉक्समधील एका वाटीत दाल आणि दुसऱ्या वाटीत 24 कॅरेट सोन्याच्या पावडरचा तडका असल्याचे दिसून येत आहे. या डिशला ‘दाल कश्कन’ नावाने ओखळले जात आहे. रेस्टॉरंटमधील स्पेशल फुडपैकी 24 कॅरेट तडका दाल एक आहे. या डिशची किंमत 58 दिरहम म्हणजेच भारतीय चलनात 1300 रुपये आहे.

‘दाल कश्कन’ चा (Dal Kashkan) व्हिडीओ मेहुल हिंगू नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 24 कॅरेट तडका दाल सर्व्ह कशी केली जातेय हे दिसून येत आहे.

या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटले आहे की, "रणवीर बरार, दुबई(Dubai) फेस्टिव्ह सिटी मॉलद्वारे कश्कनमधील 24 कॅरेट सोन्याची तडका दाल." हिंगू नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला अनेकांनी पाहिले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
24 कॅरेट तडका दालचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी म्हटले की, “ही तडका दाल लाकडाच्या संदूकमध्ये किती वर्ष सुरक्षित ठेवण्यात आली होती?”, दुसऱ्याने म्हटले की, “तडका दालसोबत सर्टिफिकेट देखील देतात का?”, तिसऱ्याने म्हटले की, "आपल्या शरिराला सोन्याची गरज नाही. पाण्याचा एक थेंब या सोन्यापेक्षा हजारपट उत्तम आहे." व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी कौतुक केले तर काहींनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा : 

Fried Chicken Recipe : KFC सारखी फ्राइड चिकनची रेसिपी जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

OMG! बांगड्या विकणाऱ्या महिलेचा Fluent English बोलतानाचा VIDEO VIRAL, युजर्स करताहेत कौतुक

Share this article