ALT Balaji सह या अ‍ॅपवर गुगलने कारवाई करत प्ले स्टोअरवरुन हटवले, जाणून घ्या कारण

भारतातील मॅट्रोमोनी अ‍ॅपसह 10 अ‍ॅपवर गुगलकडून कारवाई करण्यात आली आहे. खरंतर, या अ‍ॅपकडून गुगलच्या बिलिंग पॉलिसीवर सहमती दर्शवली नव्हती. याच कारणास्तव कारवाई करण्यात आली आहे. अशातच कंपन्यांनी गुगलकडे 19 मार्चपर्यंत मूदत मागितली आहे.

Google Action on Apps :  गुगलने 10 भारतीय अ‍ॅपवर कारवाई करत प्ले स्टोअरवरुन हटविले आहेत. खरंतर, अ‍ॅपने बिलिंग पॉलिसी मान्य न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. गुगलने 1 मार्चला म्हटले की, वाढीव कालावधीसाठी अ‍ॅप बिलिंग पॉलिसीच्या कंप्लायन्सच्या ऑप्शनला ज्या कंपन्या मान्य करत नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

या कंपन्यांवर गुगलची कारवाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलने भारत मॅट्रिमोनी, शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम, 99 एकर्स डॉट कॉम, ऑल्ट, स्टेज, अहा, ट्रुली मॅडली, क्वॅक क्वॅक, कुकू एफएम आणि एफआरएनडी अशा कंपन्यांचे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटविण्यात आले आहेत. गुगलने म्हटले आहे की, कंपनीकडे दीर्घकाळ होता तरीही त्यांनी बिलिंग पॉलिसीवर सहमती दर्शवली नाही. अशातच कारवाई करावी लागली.

कंपन्यांना दिली होती तीन वर्षांची मूदत
गुगलने कारवाई करत म्हटले की, या कंपन्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ दिला होता. तरीही कंपन्यांनी बिलिंग पॉलिसीसंदर्भात तयारी केली नाही.

पुढील सुनावणी 19 मार्चला
सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारीला भारत मॅट्रिमोनी सारख्या इंटरनेट कंपन्यांना गुगल प्ले स्टोअरवरुन हटवू नये म्हणून आदेश मंजूर करण्यासाठी नकार दिला होता. पुढील सुनावणी येत्या 19 मार्चला होणार आहे.

या अ‍ॅपने मागितली वाढीव मूदत
या प्रकरणात अ‍ॅपकडून वाढीव मूदत मागण्यात आली आहे. याशिवाय 19 मार्चपर्यंत गुगल प्ले स्टोअरवरुन हटवू नये असेही म्हटले आहे. कारण या दिवशी कोर्टाचा निर्णय येणार आहे.

आणखी वाचा : 

FasTag संदर्भातील हे काम आजच करा, अन्यथा होईल मोठे नुकसान

MWC 2024 आधी Xiaomi ने लाँच केले हे धमाकेदार प्रोडक्ट्स, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Deepfake च्या प्रकरणांना आळा बसण्यासाठी मेटाचा नवा प्लॅन, युजर्सला रिपोर्ट करणे होणार सोपे

Share this article