
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. साताऱ्यातील मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजप आणि सरकारवर गंभीर आरोप केले. लोकशाहीवर विश्वास उरला नाही, सत्ता दुरुपयोग होत आहे आणि राज्यात हुकूमशाही पद्धती सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधकांना न्याय मिळेल का, निवडणुका कशा पार पडतील याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.