उदयनराजे भोसले यांनी मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, पत्नीने मिठी मारून व्यक्त केल्या भावना

उदयनराजे भोसले यांनी मतमोजणी चालू असताना आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल मंदिर या त्यांच्या निवासस्थानी जाऊन जल्लोष साजरा केला आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नीने गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

vivek panmand | Published : Jun 4, 2024 10:33 AM IST

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून परत एकदा निवडणूक लढवली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे निवडून आले आहेत. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर झाली असून आघाडी पिछाडी चालू होती. त्यामुळे उदयनराजे आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. 

उदयनराजे यांनी आघाडी घेतल्यावर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष - 
उदयनराजे यांनी १४ व्या फेरीअखेर ४,००० मंदिरांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल मंदिर येथे आघाडी घेतली होती. येथे पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला . यावेळी उदयनराजे भोसले यांची बायको त्यांच्या गळ्यात पडून रडल्याचे दिसून आले. त्यानंतर उदयनराजे हे रडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण भावनात्मक वातावरण तयार झाले आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी कसा केला प्रचार - 
खासदार उदयनराजे भोसले यांना आधी तिकीट जाहीर केले नव्हते. उदयनराजे भोसले यांना आधी तिकीट जाहीर झाले नव्हते पण नंतर दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना भाजपचे तिकीट देण्यात आले. उदयनराजे भोसले यांच्यासाठी महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचार केला होता, त्यानंतर उदयनराजे भोसले हे निवडून आल्यामुळे जल्लोष केला जात आहे.
आणखी वाचा - 
Lok Sabha Elections 2024 Results Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Share this article