Hassan Constituency Result : नारीशक्तीने प्रज्वल रेवण्णाचा केला पराभव, हसन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी

सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी प्रज्वल रेवण्णा याचा हसन लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आहे. या आरोपीच्या विरोधात नारीशक्तीने एकत्र येऊन मतदान केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा याचा पराभव झाला आहे. हासन लोकसभा मतदारसंघातून २५ वर्षांपासून पहिल्यांदाच काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. हासन मतदारसंघामध्ये एकहाती वर्चस्व असलेल्या मतदारसंघात झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे. 

प्रज्वल रेवण्णा कोणत्या गुन्ह्यात होता अटक 
प्रज्वल रेवण्णा याचे २९७६ व्हिडीओ व्हायरल झाले होते. २०१९ साली त्यांनी भाजपच्या मंजू ए यांचा विरोध करण्यात आला आहे. प्रज्वल रेवांना हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू होते. त्यांनी केलेल्या या स्कॅन्डलमुळे पक्षाचे आणि देवेगौडा यांचे नाव मोठ्या प्रमाणावर बदनाम झाले देशातील दुसऱ्या टप्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार होते. 

नेमकं प्रकरण काय आहे? - 
प्रज्वल रेवण्णा उभे राहिलेल्या लोकसभा मतदारसंघात चार दिवसाआधीच २४ एप्रिल २०२४ या दिवशी काही लोकांनी पेन ड्राइव्ह फेकून दिले होते. या पेन ड्राइव्हमधील व्हिडीओ शेअर करण्यात आले आणि त्यानंतर प्रज्वल रेवण्णा हे जर्मनी येथे पळून गेले होते. त्यानंतर ते भारतात आल्यानंतर त्यांना महिला पोलिसांनीच विमानतळावर अटक केली होती. प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव जेडीएस पक्षासाठी सर्वात मोठे अपयश ठरले आहे. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Elections 2024 Results Live Updates : कर्नाटकातील हासन मतदारसंघातून प्रज्वल्ल रेवण्णांचा पराभव

Share this article