राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक निकालानंतर पहिली पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी हा निकाल परिवर्तनाला पोषक असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट हे कौतुकास्पद आहे. हे यश एकट्याच नसून महाविकास आघाडीचे आहे. आम्ही १० जागांवर लढून ७ जागावर पुढे आहोत म्हणजेच आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. मी चंद्रबाबू यांना फोन केला नसून त्यांच्याबाबत अफवा मीडियाबाबत पसरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हा निकाल परिवर्तनाला पोषक -
हा लोकसभेचा निकाल पोषक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. बारामती लोकसभेतील मतदार योग्य निर्णय घेतील ही अपेक्षा आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना लीड मिळेल अशी अपेक्षा होती. मध्य प्रदेशात अजून काम करण्याची गरज असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे. जनतेने मंदिर मशिदीवरून राजकारण जनतेने नाकारल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मी फक्त खर्गे आणि येचुरी यांच्याशी बोललो -
मी फक्त खर्गे आणि येचुरी यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सत्तास्थापनेच्या संदर्भात त्यांनी कोणाशी संपर्क झाला नसल्याचे यावेळी शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी सत्तास्थापनेच्या संदर्भात अजून कोणतेही पाऊल उचलले नसल्याची माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा -
Lok Sabha Elections 2024 Results Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात