चंदीगड महापौर निवडणुकीत मतपत्रिकेशी छेडछाड प्रकरण, अनिल मसीह यांच्यावर खटला चालवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आधिकारी अनिल मसीह यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर अनिल मसीह यांच्यावर मतपत्रिकेशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 19, 2024 1:17 PM IST / Updated: Feb 19 2024, 06:49 PM IST

Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोप प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठी कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. 

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर अनिल मसीह यांच्यावर मतपत्रिकेशी छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने तीन आम आदमी पक्षाचे नगरसेवक भाजपात सहभागी होण्याच्या घोडेबाजाराच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून मतमोजणी केली जाऊ शकते
सुप्रीम कोर्टाने महापौर निवडणुकीसंदर्भात पुन्हा झालेल्या घोडोबाजाराच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाने म्हटले की, घोडेबाजार सुरू असून हे एक गंभीर प्रकरण आहे. खरंतर, रविवारी (18 फेब्रुवारी) आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन नगरसेवकांनी भाजपात एण्ट्री केली.

दुसऱ्या बाजूला, कोर्टाने सर्व मतपत्रिका मागविल्या आहेत. कोर्टाने सुरुवातीला म्हटले की, नव्याने पुन्हा निडणूका घेण्याऐवजी मतपत्रिकांची पुन्हा मोजणी नव्या रिटर्निंग ऑफिर्स यांच्याकडून केली जाईल. दरम्यान, कोर्टाने म्हटले मतपत्रिकांचा तपास केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

आणखी वाचा : 

दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी करणाऱ्या वकीलांनी पेमेंटसाठी मागितली वाढीव मूदत

एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा

Modi Sarkar Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचे 24 भाषांमधील गाणे लाँच

Share this article