Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याकरिता मोठी अट ठेवली आहे. नेमकी काय आहे ही अट? जाणून घ्या सविस्तर माहिती...
Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) सहभागी होण्यासाठी मोठी अट ठेवली आहे. ही अट मान्य न केल्यास अखिलेश यादव राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेपासून दूर होण्याची शक्यता आहे.
अखिलेश यादव यांनी नेमकी काय अट ठेवली आहे?
जागा वाटपाची यादी निश्चित होईपर्यंत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार नाही, असे सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाची (Congress Party) यादी तयार झाली आहे, आम्ही देखील त्यांना आमची यादी दिली आहे. आता जागा वाटपाचा प्रश्न सुटल्यानंतरच समाजवादी पक्ष राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
"अट पूर्ण झाल्यास सपा काँग्रेसच्या न्याय यात्रेमध्ये होईल सहभागी"
अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितले की, जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक याद्या आल्या आहेत, आमच्याकडूनही याद्या गेल्या आहेत. ज्यावेळेस जागांचे वाटप केले जाईल, त्याच वेळेस समाजवादी पक्ष त्यांच्या न्याय यात्रेमध्ये सहभागी होईल.
भाजपावर साधला निशाणा
अखिलेश यादव (Akhilesh Yadav) पुढे असेही म्हणाले की, “अडीच कोटी लोकांची फसवणूक झाली आहे. हेच अडीच कोटी लोक भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) नाकारतील. कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे? मला पुन्हा पुन्हा याबाबत काहीही भाष्य करायचे नाही. ज्यांना चांगले बजेट मिळेल, त्यांना त्यांचीच भाषा ऐकू येणार. वर्ष 2024ची निवडणूक (Lok Sabha Election 2024) महत्त्वाची आहे. संविधान वाचवण्यासाठी, या देशाला वाचवण्यासाठी, बंधुभाव वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाने गरिबांची सर्वात मोठी फसवणूक केली आहे”.
INDIA आघाडीला सपा देणार झटका?
अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर ठेवलेल्या अटीमुळे आता समाजवादी पक्ष इंडिया आघाडीला मोठा धक्का देणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा
Kamal Nath : कमलनाथ BJPमध्ये प्रवेश करून काँग्रेसचा हात सोडणार? मुलाने दिले संकेत