Sharad Pawar Health Update l शरद पवारांच्या प्रकृतीवर प्रफुल्ल पटेलांचं अपडेट l Praful Patel

Sharad Pawar Health Update l शरद पवारांच्या प्रकृतीवर प्रफुल्ल पटेलांचं अपडेट l Praful Patel

Published : Nov 06, 2026, 02:02 PM IST

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवारांची तब्येत उत्तम असून थकव्यामुळे नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगितलं. एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी वैयक्तिक संबंध कायम असल्याचं पटेल म्हणाले. भेटीदरम्यान राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर सर्वसाधारण चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे जुने, आदराचे संबंध असून मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचंही पटेल यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय अनुभवाचाही त्यांनी उल्लेख केला.