तृणमूल काँग्रेस नेता शाहजहांला पोलिसांकडून आज 55 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अशातच शाहजहांच्या अटकेमुळे संदेशखळीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Sandeshkhali Row : संदेशखळीतील नागरिकांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेखच्या (Shahjahan Sheikh) अटकेनंतर आनंद व्यक्त केला आहे. नागरिकांनी जुन्या काळातील फिल्मी स्टाइलने आपला आनंद व्यक्त करत डान्स केला आणि मिठाईही वाटली.
पोलिसांच्या अटकेपासून सातत्याने 55 दिवस पळ काढत असलेल्या शाहजहांला अखेर अटक करण्यात आली आहे. शाहजहांच्या अटकेआधी संदेशखळीतील नागरिकांनी त्याच्या अटकेची मागणी करण्यासह महिनाभर आंदोलनही केले होते. पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून शाहजहांला मिनाखाना येथील एका घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
यावर एका स्थानिकाने प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही अशी अपेक्षा करतोय त्याची तुरुंगात रवानगी करावी आणि त्याने परत येथे कधीच येऊ नये. त्याने संदेशखळीतील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.” आता शाहजहांच्या अटकेनंतर संदेशखळीतील नागरिक आजचा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करत आहेत.
5 जानेवारीपासून फरार होता शहाजहां शेख
संदेशखळीत मोठ्या संख्येने महिलांनी शाहजहांसह त्याच्या समर्थकांनी जबरदस्ती जमिनी बळकावण्यासह लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. यानंतर शेख आणि त्याच्या समर्थकांच्या अटकेची मागणी करत संदेशखळीत एका महिन्यापेक्षा अधिक काळ आंदोलन करण्यात येत होते.
दरम्यान, शाहजहां गेल्या 5 जानेवारीपासून फरार होता. याशिवाय शाहजहांवर कथित रुपात ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, जे 5 जानेवारीला एका घोटाळ्यासंबंधित त्याच्या निवासस्थानी तपासणी करण्यासाठी गेले होते.
संदेशखळी प्रकरणात मोठा खुलासा असा झाला होता की, तृणमूल नेता आणि समर्थक आदिवासी परिवारांचे लैंगिक शोषण आणि जमिनी बळकवायचा. या प्रकरणात नेत्यासह समर्थकांच्या विरोधात 50 तक्रारी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला मिळाल्या होता. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, त्यांना जवळजवळ 1250 तक्रारी मिळाल्या आहेत, त्यापैकी 400 तक्रारी जमिनीच्या मुद्द्याशी संबंधित आहेत.
आणखी वाचा :