टाडा कोर्टाकडून वर्ष 1993 मधील साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
1993 Serial Blasts Case : अजमेर (Ajmer) येथील टाडा कोर्टाने वर्ष 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची निर्दोष मुक्तता केली आहे. आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता करण्याव्यतिरिक्त दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
टुंडाचे वकिल शफिकतुल्ला सुल्तानी यांनी म्हटले की, डाटा कोर्टाने अब्दुल करीम टुंडा यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयला (CBI) अब्दुल टुंडाच्या विरोधात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत.
लष्कर-ए-तैयबासाठी काम करायचा अब्दुल टुंडा
अब्दुल करीम टुंडा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबासाठी (Lashkar-e-Taiba) काम करायचा. टुंडा बॉम्ब तयार करण्यात पटाईत होता. राजस्थानच्या विशेष कोर्टाने वर्ष 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पुरावे अपुरे पडल्याचा हवाला देत टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. याशिवाय कोर्टाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बाबरी मशीद (Babri Masjid) विध्वंसाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त वर्ष 1992 मध्ये झालेल्या काही ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या हल्ल्यात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते.
दाऊद इब्राहिमचा जवळीक मानला जायचा टुंडा
अब्दुल करीम टुंडा सध्या 84 वर्षांचा आहे. टुंडाचा काही बॉम्बस्फोटात हात होता. त्यापैकीच एक वर्ष 1996 च्या बॉम्बस्फोटाप्रकरणात टुंडाला दोषी ठरविण्यात आले होते. यासाठी टुंडा जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करत होता. अब्दुल करीम टुंडाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळीक मानले जायचे. याशिवाय टुंडाच्या बॉम्ब बनवण्याच्या कौशल्यामुळे त्याला डॉ. बॉम्बच्या रुपातही ओखळले जायचे.
आणखी वाचा :