प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language

प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language

Published : Aug 18, 2026, 01:02 PM IST

मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबर चालकांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकले नाही तर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल आणि पुढे परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. परमिट नूतनीकरणाच्या वेळी परमिट रद्द करण्याचीही तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील नऊ लाखांहून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांपैकी मोठ्या संख्येने अमराठी चालक असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, १०५ दिवसांच्या अभियानातील ४० ते ५० दिवसांत १ लाख ६५ हजार ६०० अमराठी चालकांनी मराठी प्रशिक्षण घेतल्याची माहिती त्यांनी दिली. १९ ऑगस्टला मंत्रालयात आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, दर महिन्याला अभियानाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवाशांनी तक्रार करण्याऐवजी रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी मराठीत संवाद साधावा, असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027