
शाळेला जाताना खराब रस्त्याचा या मुलींनी व्हीडिओ बनवला. हातात छत्रीचा माईक तयार केला आणि रस्त्याची दूरवस्था सर्वांना दाखवली. खरं तर खराब रस्ता बघून त्यांच्या मनात आलं की, याची अशी एक बातमी होवू शकते, त्यांनी मजे मजेत ते शूट केलं. यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रशासनाला रस्ता बनवावा लागला आणि खड्डे बुजवावे लागले, या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुलींना मुंबईत त्यांच्या घरी बोलवून त्यांचं कौतुक केलंय.