नितीन गडकरी यांचा जाहीर कार्यक्रमात धक्कादायक निर्णय | Nitin Gadkari Goa Speech

नितीन गडकरी यांचा जाहीर कार्यक्रमात धक्कादायक निर्णय | Nitin Gadkari Goa Speech

Published : Sep 11, 2026, 08:00 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर बोलताना आपली कर्मभूमी आणि कार्यभूमी असलेल्या मतदारसंघातूनच, पक्ष संधी देईल तोपर्यंत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. गोवा आणि महाराष्ट्राचे तसेच मराठी आणि कोकणीचे वेगळे नाते असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कंत्राटदार अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत कठोर भूमिका मांडली. महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नसल्याचे सांगताना इतका उशीर झाल्याची आपल्याला लाज वाटते, असेही ते म्हणाले. महामार्गाचे सुमारे 93-94 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावरून गाडीने गोव्यापर्यंत प्रवास करून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासोबतच महामार्गावर गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसह रोड साइड अ‍ॅमेनिटीज, गोव्याचे खाद्यपदार्थ, हँडलूम-हँडीक्राफ्ट तसेच पेट्रोल-डिझेलसोबत बायोफ्युएल, इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनाच्या सुविधा उभारण्याची सूचना त्यांनी केली.