मनोज जरांगे: मराठ्यांना मुंबईत पोहोचण्याचं आवाहन  | Manoj Jarange | Maratha Protest

मनोज जरांगे: मराठ्यांना मुंबईत पोहोचण्याचं आवाहन | Manoj Jarange | Maratha Protest

Published : Sep 01, 2026, 12:08 AM IST

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारकडून चर्चेची दारे खुली असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केले. सरकारने चर्चेची दारे खुली असल्याचे सांगितले असले तरी आपल्याला त्यांच्याकडे चर्चेसाठी जायचे नसल्याचे जरांगे म्हणाले. सरकारने मागण्यांवर निर्णय घ्यावा आणि रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे. जरांगे यांनी 58 लाख नोंदी आणि त्यासंदर्भातील प्रमाणपत्रांचा मुद्दाही उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्टता द्यावी, असे ते म्हणाले. शैक्षणिक प्रवेशाशी संबंधित रद्द प्रमाणपत्रांचाही त्यांनी उल्लेख केला. दरम्यान, जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत आपल्या सोयीनुसार हळूहळू मुंबईत पोहोचावे आणि मित्र किंवा नातेवाईकांकडे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आपणही मुंबईत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषण सोडणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारकडून अद्याप आपल्याशी संपर्क झालेला नसल्याचा दावा करत उदय सामंत यांनी सांगितलेल्या 24 तासांत संपर्काच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले.