
मनोज जरांगे अंतरवाली सराटी गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधला. अंतरवाली आणि मराठा समाजाचे नाते कधीही तुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठीचे निर्णायक आंदोलन अंतरवालीतूनच सुरू झाले असून मुंबईत आंदोलन झाले तरी त्याची सुरुवात अंतरवालीतूनच झाल्याचे जरांगे म्हणाले. सरकारने तीन महिन्यांची वेळ मागितल्याचा उल्लेख करत पुन्हा लढाईतून माघार घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या काळात अंतरवालीतील ग्रामस्थांनी केलेली सेवा आणि योगदान महाराष्ट्रातील कोणीही विसरू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले.