Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला

लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत.

Chanda Mandavkar | Published : Mar 16, 2024 6:04 AM IST / Updated: Mar 16 2024, 04:03 PM IST

Lok Sabha Election 2024 :  दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अखेर लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. याशिवाय देशात 97 कोटी नोंदणीकृत मतदार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  देशात लोकसभा निवडणुका येत्या सात टप्प्यात होणार आहे. 

सात टप्प्यातील निवडणूक होणार

 

NDA विरुद्ध INDIA
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी तयार केली आहे. इंडियाच्या आघाडीमध्ये 150 खासदार आहेत. याशिवाय एनडीएमध्ये 40 राजकीय पक्षांचा समावेश असून 350 पेक्षा अधिक खासदार आहेत. दरम्यान, काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीला यंदाच्या निवडणुकीत झटका लागण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडीतील काही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.

वर्ष 2019 मध्ये सात टप्प्यात झाल्या होत्या निवडणुका
वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात झाली होती. या निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने 10 मार्चला केली होती. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी झाले होते. या निवडणुकीचे निकाल 23 मे, 2019 रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी देशातील 91 कोटींहून अधिक मतदार होते. त्यापैकी 67 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

वर्ष 2019 मधील निवडणुकीचा निकाल
वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला वर्ष 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळाला होता. वर्ष 2014 मध्ये भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय वर्ष 2019 मध्ये 303 जागा, एनडीला 353 जागांवर विजय मिळवता आला होता. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा अधिक मत मिळाली होती. एनडीला 45 टक्के मत आणि काँग्रेस पक्षाला केवळ 52 जागांवर विजय मिळवत समाधान मानावे लागले होते.

आणखी वाचा : 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी BJP ला मोठा धक्का, खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला ठोकला रामराम

लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील जनतेला खुले पत्र, कलम 370 ते GST च्या मुद्द्यांवर टाकलाय प्रकाश

Voter Education : आदर्श आचार संहिता म्हणजे काय? जाणून घ्या कोण लागू करतात आणि नियमांबद्दल सविस्तर

Read more Articles on
Share this article