20 वर्षांपासून नवरा बायकोशी बोललाच नव्हता, कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

Published : Mar 16, 2024, 02:26 PM IST
6 tips to overcome the fight between husband and wife

सार

नवरा बायकोमध्ये भांडण होतात, हे आपल्याला माहित आहे. पण जगात असे काही लोक असतात जे भांडण झाल्यानंतर एकमेकांशी बरेच वर्ष बोलत नाही. असेच एक उदाहरण समोर आले आहे.

नवरा बायकोमध्ये भांडण होतात, हे आपल्याला माहित आहे. पण जगात असे काही लोक असतात जे भांडण झाल्यानंतर एकमेकांशी बरेच वर्ष बोलत नाही. असेच एक उदाहरण समोर आले आहे. त्यामध्ये नवरा आणि बायको एकमेकांशी तब्बल 20 वर्षांपासून जास्त काळ बोलले नाहीत. पती पत्नीवर या प्रकरणात इतका नाराज होता की एकत्र राहत राहत असूनही त्याने तिच्याशी न बोलण्याची शपथ घेतली होती. 

जपानमधील असणारे हे कुटुंब एका विचित्र नात्यात राहत होते. औटो कटायामा आणि युमी असे त्या दोघांचे नाव होते. यावेळी हे दोघे बोलत नसल्याचे मुलांच्या लक्षात आले होते. यावेळी त्यांच्या मुलाने एका टीव्ही शोला याबाबत सांगितले होते, हे समजल्यानंतर त्या टीव्ही शोने या दोघांना बोलावले होते. यावेळी ओटो यांना कारण विचारले असताना त्यांनी त्याचे उत्तर दिले आहे. 

यावेळी बोलताना ओटो याने सांगितले की, त्याची बायको मुलांची जास्त काळजी घेत असायची आणि त्याच्याकडे लक्ष देत नव्हती, त्यामुळे अडचण निर्माण होत होती. यावेळी नवऱ्याने बायकोशी बोलताना तू खूप हालाखीत दिवस काढून मुलांचा सांभाळ केल्याचा म्हटले आहे. तसेच मुलांना सांभाळल्यानंतर तू स्वतःकडे लक्ष दिले नाही. यावेळी त्यांची मुले दोघांचे संभाषण ऐकत होती. 
आणखी वाचा - 
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी BJP ला मोठा धक्का, खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला ठोकला रामराम
Loksabha Election : देशातील पक्ष कोणत्या चेहऱ्यांना घेऊन निवडणूक लढवणार, या निवडणुकीत कोणते मुद्दे पुढे येणार?

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा