मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette

Published : Aug 16, 2026, 07:03 PM IST

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार प्रमाणपत्रे आणि प्रलंबित व्हॅलिडिटी देण्याची मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी सापडलेल्या आणि त्यानुसार अर्ज केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्रे देण्याची मागणीही त्यांनी मांडली. तसेच हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरसंदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. EWS, SC आणि ST प्रवर्गातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, बलिदान गेलेल्या कुटुंबांना नोकरी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कर्जावरील व्याज परतावा आणि सारथीच्या योजनांबाबतही त्यांनी मुद्दे मांडले. याचदरम्यान मराठा अभ्यासकांसोबत झालेल्या बैठकीत हैदराबाद गॅझेटमधील बदल तसेच सातारा, कोल्हापूर आणि इतर गॅझेटियरसंदर्भातील निर्णयांवर चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027