Election Commissioner : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवड निवडणूकीच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती लोकसभेतील काँग्रेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 14, 2024 11:49 AM IST / Updated: Mar 14 2024, 05:22 PM IST

Election Commissioner :  लोकसभा निवडणुकीसाठी ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीर संधू (Sukhbir Sandhu) यांची निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सरकारने याची माहिती देण्याआधी लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी गुरुवारी (14 मार्च) मीडियाला सांगितले. 

दरम्यान, अधीर रंजन चौधरी देखील निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीचे सदस्य आहेत. बैठकीनंतर समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, निवड सिमितीने सहा नावांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यापैकी उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, ज्ञानेश कुमार, इंदीवर पांडे, सुखबीर सिंह संधू आणि गंगाधर राहत यांच्या नावाचा समावेश होता. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.

बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अधीर रंजन चौधरी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थितीत होते. अधीर रंजन चौधरी यांनी निवड समितीमध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या जागी एक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करणाऱ्या कायद्यावरुन केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, भारताच्या मुख्य न्यायाशीधांनी या समितीमध्ये असावे.

अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, माझ्याकडे बुधवारी रात्री 212 नावे देण्यात आली होती. यामुळे बुधवारीच दिल्लीत आलो आणि दुपारी बैठकीला उपस्थिती लावली. खरंतर एका दिवसात दोनशेपेक्षा अधिक नावांची तपासणी करणे मुश्किल आहे. अशातच बैठकीआधी सहा नावे ठरवण्यात आली.

याआधी निवडणूक आयोगाने दोन निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक केली. ही बैठक आधी 15 मार्चला संध्याकाळी 6 वाजता होणार होती. निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय हे गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झाले. याशिवाय अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त झाली होती. अशातच एसएस संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाणार आहे.

आणखी वाचा : 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहात? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Mission 370 : लोकसभेसाठी भाजपने जारी केलेल्या यादींमध्ये 21 टक्के VIP चा पत्ता कट, जाणून घ्या कोणाला तिकिट नाकारले

SBI ने सुप्रीम कोर्टासमोर सादर केला इलेक्टोरल बाँड डेटा, 2 पीडीएफ फाईल्समध्ये दडले आहेत सर्व रहस्य

Read more Articles on
Share this article