लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहात? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तुमची गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.

First Time Voting Important Things To Know : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा लवकरच जारी केल्या जाऊ शकतात. या निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची सत्ता देशात स्थापन होणार हे स्पष्ट होते. भारतात वयाच्या 18 व्या वर्षावरील सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे. अशातच तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मतदान केंद्रावर मोबाइल फोन सोबत नेण्यास बंदी
मतदानाच्या दिवशी देशभरात सुट्टी असते. जेणेकरुन नागरिकांना मतदान करता यावे. यामुळे सुट्टीचा दिवस न मानता नागरिकांनी मतदान करावे असे प्रत्येक निवडणुकीवेळी सांगितले जाते. याशिवाय मतदान गुप्त पद्धतीने केले जाते. मतदान केंद्रावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत घेऊन जाण्यास परवानगी नाही. तुम्ही मोबाइल फोन, कॅमेरा, इअर फोन, हेड फोन किंवा स्मार्ट वॉच सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

तुमचे मतदान केंद्र शोधा
मतदान करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमचे मतदान केंद्र शोधा. यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ voters.eci.gov.in ची मदत घेऊ शकता. अथवा तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 1950 वर फोन करू शकता. याशिवाय तुम्ही निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाइन अ‍ॅपचा वापर करू शकता.

ओखळपत्राची आवश्यकता
मतदान केंद्रावर मदतान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ओखळपत्र तपासून पाहण्यासह मतदार यादीत नाव आहे की नाही हे देखील पाहिले जाते. यामुळे तुम्हाला मतदान करण्याआधी खालीलपैकी कोणतेही एक ओखळपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

मतदानाची प्रक्रिया
पहिल्यांदा मतदान करणार असाल तर, मतदान केंद्राबाहेर तुम्हाला रांगेत उभे राहावे लागेल. यानंतर मतदान अधिकारी तुमचे मतदार यादीत नाव तपासून पाहिल्यानंतर ओखळपत्र पाहतील. मतदान केल्यासंदर्भातील एक निळ्या रंगातील शाई तुमच्या बोटाला लावली जाईल. एक स्लिप देण्यासह तुमची सही घेतील.

दुसऱ्या टेबलवर जाऊन येथे मतदान अधिकारी तुम्हाला दिलेली स्लिप देतील आणि तपासून पाहतील तुमच्या बोटाला शाई लावलीय की नाही. यानंतर तुम्हाला मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशीनजवळ पाठवले जाईल.

कसे कराल मतदान?
ईव्हीएम मशीनजवळ (EVM Machine) गेल्यानंतर त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नाव आणि चिन्ह दिसतील. त्यापैकी एका बटणावर क्लिक करून तुम्ही मतदान करू शकता. मतदान केल्यानंतर लाल रंगातील बल्ब पेटेल. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही यशस्वीपणे मतदान केले आहे. बॅलेट युनिटला लावलेल्या VVPT मधून एक स्लिप प्रिंट होऊन येईल. यावरून कळते की, तुम्ही कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे.

आणखी वाचा : 

Mission 370 : लोकसभेसाठी भाजपने जारी केलेल्या यादींमध्ये 21 टक्के VIP चा पत्ता कट, जाणून घ्या कोणाला तिकिट नाकारले

Aadhaar Update : आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, 10 वर्षे जुने आधार होणार मोफत अपडेट

मिसाईल राणी : शीना राणी यांनी अग्नी 5 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी केले प्रयत्न, घ्या माहिती जाणून

Read more Articles on
Share this article