'CAA मुस्लिम विरोधी नाही', अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधकांवर सोडले टिकास्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांनी सीएए मुस्लिम विरोधी नसल्याचे म्हटले आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 14, 2024 7:07 AM IST / Updated: Mar 14 2024, 12:47 PM IST

Citizenship Amendment Act : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलताना म्हटले की, हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. खरंतर, विरोधकांनी सीएए लागू केल्यानंतर याच्या विरोधात विधाने करण्यास सुरुवात केली होती.

अमित शाह यांनी ANI यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन कमीतकमी 41 वेळा सीएए बद्दल बोललो आहे. याशिवाय अल्पसंख्यांना सीएए संदर्भात घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण कोणत्याही नागरिकाचे अधिकार हिरावून घेण्याची तरतूद सीएएमध्ये नाही.

सीएएच्या माध्यमातून नागरिकता मिळणाऱ्यांना वेगळी ओखळ मिळणार का असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला होता. यावर अमित शाह यांनी उत्तर देत म्हटले होते की, भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच अल्पसंख्यांकांना नागरिकत्वाच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे. त्यांच्याकडेही तेवढेच अधिकार असणार आहेत जे सर्वसामान्यांना दिले गेले आहेत. ते निवडणूल लढवू शकतात, आमदार-खासदार होऊ शकतात.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सीएएबद्दल केलेल्या विधानावरच प्रतिउत्तर देत अमित शाह यांनी म्हटले की, या कायज्याअंतर्गत मुस्लिमांचे धार्मिक शोषण होऊ शकत नाही. कारण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे इस्लामिक राज्य म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे एनआरसीची (NRC) कोणताही तरतूद नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने CAA चा निर्णय घेतला
नागरिकत्व सुधारणा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आणला आहे. याशिवाय सीएए रद्द करणे शक्य नाही. तो कायदा पूर्णपणे संविधानिक रुपात वैध आहे. सुप्रीम कोर्टाने देखील सीएएवर बंदी घातलेली नाही.

याशिवाय केरळ (Kerala), तमिळनाडू (Tamil Nadu) आणि पश्चिम बंगालमधील (West Bengal) सरकारने आम्ही सीएए लागू करण्यास देणार नाही असे म्हटले आहे. यावर अमित शाह यांनी म्हटले की, आपल्या संविधानातील परिच्छेद 11 हा संसदेला नागरिकतेसंबंधित नियम तयार करण्याची परवानगी देतो. हा केंद्राचा विषय आहे. राज्याचा नव्हे. मला वाटते की, निवडणुकीनंतर प्रत्येकजण सहाय्य करेल.

पंतप्रधानांचे प्रत्येक आश्वासन खरं होतेय - अमित शाह
सीएएच्या माध्यमातून भाजप वोट बँक तयार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर अमित शाह यांनी म्हटले की, विरोधांकडे कोणतेही काम नाही. विरोधकांनी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइलमध्ये राजकीय फायदा असल्याचे म्हटले होते. खरंतर, दहशतवादाच्या विरोधात कार्यवाही करू नये का? असा सवाल अमित शाह यांनी विरोधकांना विचारला. याशिवाय कलम 370 हटवणल्याने देखील भाजपला राजकीय फायदा होणार असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. आम्ही वर्ष 1950 पासून सांगत आलोय की, आम्ही कलम 370 हटवणार आहोत. विरोधकांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात पण तसे करून दाखवत नाही. पण मोदींजींचा इतिहास प्रत्येक आश्वासन पूर्ण करून दाखवत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.

आणखी वाचा : 

Mission 370 : लोकसभेसाठी भाजपने जारी केलेल्या यादींमध्ये 21 टक्के VIP चा पत्ता कट, जाणून घ्या कोणाला तिकिट नाकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केले सूरज पोर्टल, काँग्रेस सरकारने वंचितांची पर्वा केली नसल्याची केली टीका

उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिली ऑफर, नितीन गडकरींनी ठाकरेंना दिले प्रत्युत्तर

 

Share this article