फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3

फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3

Published : Aug 17, 2026, 09:06 PM IST

देवेंद्र फडणवीस यांनी आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, आपण महाराष्ट्रातच असून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नव्या टीममध्ये भारती पवार यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबाबत फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आणि संपूर्ण टीम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहती, शेंद्रा-बिडकीनमधील अतिरिक्त ८ हजार एकर जमीन, सावनेरमधील ६ हजार एकर जमीन, दिघी आणि मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरवरील MIDC तसेच महाराष्ट्राला अधिकाधिक इंडस्ट्रियल पार्क मिळण्याबाबत प्रस्ताव मांडल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे मेट्रो-३ चे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या टेस्टिंग सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027