
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे अचूक होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी केलेले पंचनामे ग्रामसभेसमोर ठेवावेत, जेणेकरून कोणताही बाधित सुटणार नाही, असे त्यांनी म्हटले. पीक विमा कंपन्यांसोबत मंत्रिमंडळ उपसमिती बैठक घेऊन कोणत्या शेतकऱ्यांना आणि कशाप्रकारे लाभ देण्यात आला, याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगावरील राज ठाकरे आणि INDIA आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांवरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. संवैधानिक संस्थांवर आरोप करून ‘नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच “राहुल गांधी म्हणजे पराभव, मोदीजी म्हणजे विजय” असे म्हणत पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगावर आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली.