पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठा डाव खेळण्याच्या तयारीत, प्रशांत किशोर यांचा दावा
आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय होण्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
Chanda Mandavkar | Published : Mar 14, 2024 6:42 PM / Updated: Mar 14 2024, 06:50 PM IST
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजप पक्षाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दावा केलाय की, भाजप पश्चिम बंगालमध्ये मोठा डाव खेळण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे.
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी म्हटले की, मी कोणतेही भाकीत करत नाही. पण असे दिसतेय की, भाजप तृणमूल काँग्रेसपेक्षा (Trinamool Congress) उत्तम कामगिरी करतेय. आपल्याला भाजपचा (BJP) मोठा विजय होण्याच्या तयारीत रहावे लागणार आहे. भाजप पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या जागेवरील सर्वाधिक मोठा पक्ष होऊ शकतो. ज्यावेळी मी असे म्हणतो तेव्हा काहीजण मला भाजपचा एजंट असल्याचे म्हणतात. भाजप पश्चिम बंगालमध्ये कमबॅक करण्याची स्थिती दिसून येत आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेससाठी सध्याची वेळ कठीण आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची कारणे
एकट्याने निवडणूक लढतोय तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधी मते विखुरली जात आहेत. येथे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीएम स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. यामुळेच तिन्ही पक्ष एकमेकांची मत कापू शकतात. अशातच भाजपला याचा थेट फायदा होऊ शकतो.
संदेशखळी प्रकरण संदेशखळी प्रकरणात महिलांसोबत तृणमूल कांग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचाराची बातमी समोर आल्यानंतर भाजपने त्याला मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात तृणमूल कांग्रेस स्वत: चा बचाव करू पाहत आहे. राज्यातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आलेल्यांचे म्हणणे आहे की, संदेशखळी मुद्दा भाजप अशा प्रकारे उचलू शकते ज्याप्रकारे ममता बॅनर्जींनी सिंगूर आणि नंदीग्रामचा मुद्दा उचलून धरला होता.
सीएए आणि राम मंदिर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम वोट बँकेचे मोठे महत्त्व आहे. ममता बॅनर्जी या वोट बँकेसासाठी नेहमीच प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला भाजपला राम मंदिर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यात हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्यास भाजपच्या जागा वाढल्या जाऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये 71 टक्के लोकसंख्या हिंदू आहे.