Crime News : कर्नाटकातील हुबळी येथे एका 20 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
Crime News : कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठच्या हत्याकांडनंतर रिलेशनशिपला नकार दिल्यने एका तरुणीवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबद्दलची तक्रारही तरुणीने पोलिसात केली होती. पण काहीच फायदा झाला नाही. घटना समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. सध्या जोरदार आंदोलन सुरु झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात बेजबाबदारपणा केल्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
अंजली नावाच्या तरुणीने गिरीश उर्फ विश्वाला तिने रिलेशनशिपसाठी नकार दिल्याने तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अंजलीने याबद्दलची तक्रार बेंडिगेरी पोलीस स्थानकात केली होती. अंजलीने तक्रारीत म्हटले होते, गिरीश नावाच्या तरुणाने मला नेहा हिरेमठसारखी तुझी हत्या करेन अशी धमकी दिली आहे. यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याएवजी अंजलीला घरी पाठवले.
नक्की काय घडले?
15 मे ला सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी गिरीशने वीरापुर ओनी स्थित अंजलीच्या घराच्या दरवाजा ठोठावा. जसा अंजलीने दरवाजा उघडला असता गिरीशने तिच्यावर चाकू हल्ला करत तेथून पळ काढला. अंजलीची बहिण यशोदाने तिची हत्या होताना पाहिलेय.
यशोदाने मीडियासोबत बोलताना म्हटले की, गिरीश गेल्या काही दिवसांपासून अंजलीला त्रास देत होता. खरंतर, अंजलीला गिरीशने रिलेशनशिपसाठी विचारले होते. पण अंजलीने त्याला नकार दिला होता. यामुळे गिरीश सातत्याने अंजलीवर त्याच्यासोबत मैसुरुला जाण्यासाठी दबाव टाकत होता. गिरीशने अंजलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. धमक्यांबद्दल पोलिसांना सांगूनही त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अशातच माझ्या बहिणीचा जीव गेल्याचे दु:ख यशोदाने व्यक्त केले आहे.
आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापन
हुबळीतील पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी म्हटले की, अंजली हत्या प्रकरणात आपली कर्तव्य विसरणाऱ्या बेंडगिरी पोलीस स्थानकातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. अंजलीच्या बहणीने तक्रार केल्यानंतर त्याच आधारावर पुढील तपास करत कारवाई केली गेली. आरोपीला अटक करण्यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल असेही रेणुका सुकुमार यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा :
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने स्वत:ला गोळी झाडून केली आत्महत्या, आत्महत्येचं नेमकं कारण काय?
घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू