Monsoon Update : हवामान खात्याने नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. कडाक्याच्या उन्हापासून लवकरच नागरिकांची सुटका होणार असून केरळात मॉन्सून कधी दाखल होणार याबद्दलचे अपडेट दिले आहे.
Monsoon Update : देशातील बहुतांश ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसागणिक तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पार जाताना दिसून येत आहे. ओडिशा येथे गेल्या 17 दिवसांपासून तापमान 40 डिग्रीपेक्षा अधिक राहत आहे. अशातच नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पण हवामान खात्याने याच उन्हाच्या तडाख्यपासून नागरिकांना कधी दिलासा मिळणार याबद्दलचे अपडेट दिले आहे.
केरळात दाखल होणार मॉन्सून
दक्षिण-पश्चिम भागात येत्या 31 मे च्या आसपास मॉन्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजस महापात्र यांनी म्हटले की, "मॉन्सून लवकर नव्हे दाखल होणार. हा एक अंदाज आहे. कारण केरळात मॉन्सूनची सुरुवात जून महिन्यापासूनच होते."
हवामान खात्याने नक्की काय म्हटलेय?
गेल्या महिन्यात हवामान खात्याने म्हटले होते की, जून ते सप्टेंबरपर्यंत असणाऱ्या मॉन्सूनवेळी दक्षिण-पश्चिम भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. जून आणि जुलै महिना शेतीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा महिना असल्याचे मानले जाते. या दरम्यान, खरीप पिकांच्या बहुतांश पेरण्या होतात.
दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला हवामान खात्याने म्हटले होते की, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि बंगाल खाडीच्या काही भागात मॉन्सून 19 मे च्या आसपास वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम भारतात तापमान वाढणार
उत्तर-पश्चिम भारतात गुरुवार (15 मे) पासून आणि पूर्व भारतात 18 मे पासून कडाक्याच्या उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागणणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम राजस्थान, पंजाब, दक्षिण हरियाणा, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, गुजरातमधील वेगवेगळ्या ठिकाणी 16-19 मे पर्यंत उष्माघाताची शक्यता आहे. कोकणात 15-16 मे, गुजरात आणि कच्छ येथे 16-17 मे, दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे 18-19 मे ला उष्माघाताची स्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा :
राज्यात नवीन कोविड सबवेरियंट 'FLiRT' च्या आढळल्या 91 केसेस
CBSE च्या निकालात मुली पुढे, किती विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण