पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत मेगा रोड शो, संपूर्ण घाटकोपर झालं भगवंमय

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो झाला. घाटकोपर परिसरातून या रोड शो पार पडला. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झाली होती, तर पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो झाला. घाटकोपर परिसरातून या रोड शो पार पडला. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झाली होती, तर पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. मात्र या रोड शोमध्ये अजित पवार दिसले नाहीत. त्यामुळे अजित पवार नक्की कुठे होते? अशी चर्चा होऊ लागली आहे.

 

पंतप्रधानांचा रोडशो होत असलेल्या मार्गावर लोकांची गर्दी पाहायला मिळली. संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झालं होतं. साधू संत महात्मेदेखील रोडवर उतरले आहेत. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आलेत. समारोप होणाऱ्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला अभिवादन करून रोडशोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. स्थानिकांनी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले.

 

About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Share this article