अमृता फडणवीस: Gen-Z चं आंदोलन योग्य दिशेने होतं, नंतर भरकटलं | GenZ | NEET | Students Protest

अमृता फडणवीस: Gen-Z चं आंदोलन योग्य दिशेने होतं, नंतर भरकटलं | GenZ | NEET | Students Protest

Published : Aug 18, 2026, 05:02 PM IST

अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याच्या चर्चेवर बोलताना, देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सेवक असून त्यांनी महाराष्ट्रातच सेवा करत राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र ही देशासाठी महत्त्वाची आणि सर्वाधिक योगदान देणारी राज्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले. Gen-Z संदर्भात अमृता फडणवीस यांनी जंतर-मंतर आंदोलनाच्या सुरुवातीचा मुद्दा NEET पेपर लीकविरोधातील असल्याने योग्य असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर विविध घटक सहभागी झाल्याने आंदोलनाची दिशा भरकटली, असे त्यांनी सांगितले. विकसित भारत 2047 आणि Make in India साकारण्यासाठी तरुणांना आवश्यक सुविधा देण्यावर सरकार काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. महिलांच्या निर्णयस्वातंत्र्याबाबत बोलताना, महिलेला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असणे म्हणजे स्त्री सशक्तीकरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सामाजिक क्षेत्रातील घटनांमध्ये कारणांचा अभ्यास करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना आणि कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या दिव्यानीचे कौतुक करताना, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी तिच्या पाठीशी उभे राहावे आणि महिला शक्तीचा गौरव करावा, असे आवाहन त्यांनी केले. पुण्यातील ११ वर्षीय मुलाच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत महापालिकेने अधिक सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027