आदित्य ठाकरे: तेव्हा तिरंगा आठवला नाही का? | Tiranga Rally | Fadnavis | Mumbai

Published : Aug 10, 2026, 09:07 PM IST

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध स्थानिक प्रश्नांसह तिरंगा रॅलीवरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. वरळीमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून मुख्यमंत्र्यांना सतत यावे लागत असल्याचे सांगत त्यांनी मुंबईतील विकासकामांचा उल्लेख केला. तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावर बोलताना, देशभर तिरंगा रॅली होत असताना तरुण-तरुणी रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्या वेळी तिरंगा का आठवला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच आदित्य ठाकरे यांनी वरळीतील सेंच्युरी मिल पुनर्विकास, स्थानिकांना घरे, पाणी आणि शाळांचे प्रश्न, मुंबईतील मोकळ्या जागा, महापालिकेच्या ठेवी, रस्ते, कचरा, शाळांना साहित्य, कोळीवाडे आणि धारावीतील जागांच्या मुद्द्यांवरही भूमिका मांडली. मुंबईतील जागा बिल्डर आणि कंत्राटदारांच्या ताब्यात जाण्याचा आरोप करत या मुद्द्यांवर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
15:44मनोज जरांगे: मराठ्यांना मुंबईत पोहोचण्याचं आवाहन | Manoj Jarange | Maratha Protest
02:44ऋतु तावडे पुण्यातील BJP कार्यकारिणी बैठकीवर | BJP Meeting | BMC Mayor
10:11Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची विविध शिष्टमंडळांसोबत चर्चा
05:10Tribal Students Protest | सुप्रिया सुळे: आदिवासी मुलांच्या पोषणाचा प्रश्न
13:15मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण | Manoj Jarange | Maratha Protest
06:05मनोज जरांगे: बंडू जाधवने मोठी चूक केली! | Manoj Jarange | Eknath Shinde
06:02देवेंद्र फडणवीस: जरांगेंशी चर्चेतून मार्ग काढू | Manoj Jarange | Maratha Protest
10:27संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis