23rd July 2025 Updates : दिल्ली-जम्मू काश्मीर या ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय कल्याणमधील खासगी क्लिनिकमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा....

11:56 PM (IST) Jul 23
Pm Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत गोरगरिबांना घर खरेदी किंवा बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष आहेत, आणि एकाच कुटुंबातील दोन भावांनाही स्वतंत्र लाभ मिळू शकतो, पण काही अटींसह.
10:54 PM (IST) Jul 23
PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजना १८ पारंपरिक व्यवसायांतील कारागिरांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देते. यात प्रशिक्षण, दैनिक भत्ता, टूलकिट प्रोत्साहन आणि कमी व्याजदराचे कर्ज यांचा समावेश आहे.
09:31 PM (IST) Jul 23
Mumbai High Tide Alert July 2025 : २४ ते २७ जुलै २०२५ दरम्यान मुंबईच्या किनाऱ्यांवर मोठ्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
08:30 PM (IST) Jul 23
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्जांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
06:19 PM (IST) Jul 23
Divisional Commissioner Amravati Bharti 2025 : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०' अंतर्गत शहर समन्वयक पदांसाठी ५५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
05:46 PM (IST) Jul 23
Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 : महाराष्ट्र नगर परिषद 2025 मध्ये 3138 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करणार आहे. गट क आणि गट ड मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
04:59 PM (IST) Jul 23
Tanushree Dutta- Nana Patekar : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. २०१८ मधील #MeToo प्रकरणाला उजाळा देत तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले.
03:42 PM (IST) Jul 23
पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीची एक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
12:42 PM (IST) Jul 23
मुंबई - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने प्रथमच राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली असून 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.
12:38 PM (IST) Jul 23
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून राज्यातील पहिले आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह जुळणी ब्युरो सुरू केले आहे. यामुळे धर्माबाहेर विवाह करणाऱ्या महिला आणि पुरुषांना आपल्या हक्काचे व्यावसपीठ उपलब्ध होणार आहे.
11:56 AM (IST) Jul 23
मुंबई - सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर लाखावर पोहोचले आहे. ग्राहकांची खरेदी वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिणामांमुळे दर वाढले आहेत. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर.
11:27 AM (IST) Jul 23
ही संपूर्ण घटना त्या इमारतीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, यासंदर्भात संबंधित डिलिव्हरी बॉयविरोधात बोलींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
10:01 AM (IST) Jul 23
श्रावणात भगवान शंकरांच्या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जातात. अशातच भीमाशंकर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी खास उपाययोजना केल्या जाणार आहेत.
09:54 AM (IST) Jul 23
ही पीडित महिला आणि तिचा पती दोघेही क्लास वन सरकारी अधिकारी आहेत. त्यांचे लग्न २०२० साली झाले होते. सुरुवातीला दोघांचाही संसार सुरळीत सुरु होता. परंतु काही काळानंतर पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय निर्माण झाला.
09:24 AM (IST) Jul 23
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय कोकणासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलॅर्ट जारी करण्यात आला आहे.
09:00 AM (IST) Jul 23
यंदा गणेशोत्सवाचा सण 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी आतापासूनच सार्वजनिक मंडळांची लगभग सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
08:54 AM (IST) Jul 23
08:28 AM (IST) Jul 23
कल्याणमधील खासगी क्लिनिकमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जितेंद्र गुप्ता यांनी घटनेबद्दल माहिती देत सांगितले की, तरुणाने तरुणीवर जोरदार हल्ला चढवला. सामान्य व्यक्ती असे करत नाही. खासकरुन ती महिला असेल तर. त्या व्यक्तीने जे केले ते समाजासाठी घातक आहे. तरुणीवर आमच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत."