'कल्कि 2898 एडी' ची लाट, तरीही रेकॉर्डब्रेक कमाई करतोय विजय सेतुपतिचा 'महाराजा' सिनेमा

'Maharaja' box office collection : सध्या सर्वत्र 'कल्कि 2898 एडी' सिनेमाचा डंका वाजत आहे. सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत असतानाच विजय सेतुपतीचा 'महाराजा' सिनेमाही बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसून येतोय.

Chanda Mandavkar | Published : Jul 4, 2024 4:32 AM IST
15
'कल्कि 2898 एडी' सिनेमानाच बॉक्स ऑफिसवर धमाका

प्रभास, दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 एडी' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसून येत आहे. सिनेमा दररोज नवे रेकॉर्ड ब्रेक करतोय. सिनेमाची अवघ्या सात दिवसांमधील कमाई 700 कोटी रुपयांच्या पार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. पण विजय सेतुपतीचा 'महाराजा' सिनेमाचीही धूम प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.

25
विजय सेतुपतीचा सिनेमा

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपितीचा सिनेमा महाराजा देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. वर्ष 2024 मधील टॉप सिनेमांपैकी एक महाराजा ठरला आहे. कल्किची लाट असतानाच महाराजा सिनेमाने तिसऱ्या आ

आठवड्यात वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

35
तमिळ बॉक्स ऑफिसवरील दुसरा हिट सिनेमा

तमिळ सिनेमाला 'महाराजा' सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण अर्ध वर्ष गेले तरीही कॉलीवूडला एकही मोठा हिट सिनेमा मिळालेला नाही. महाराजानंतर 'अरनमनई-4' बॉक्स ऑफिसवक 99.53 कोटी रुपयांची कमाई करणारा दुसरा मोठा हिट सिनेमा आहे. देशाअंतर्गत महाराजा सिनेमाने 76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कल्कि सिनेमा रिलीज झाल्यानंतर महाराजा सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला आहेच. पण दोन सिनेमांमध्ये तडगी स्पर्धा असतानाही विजय सेतुपतिचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून गर्दी केली जातेय.

45
महाराजा सिनेमाची कथा

विजय सेतुपतीने महाराजा सिनेमात एका वडिलांची भूमिका साकारली आहे. विजय सेतुपती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे दाखवले आहे. सिनेमातील विजयची भूमिका नेहमीप्रमाणे उत्तम आणि धमाकेदार आहे. सिनेमाची कथा अ‍ॅक्शन-थ्रिरलवर आधारित आहे. महाराजा सिनेमाचे दिग्दर्शन निथिलन स्वामीनाथन यांनी केले आहे. विजय सेतुपतीसह अनुराग कश्यपही मुख्य भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार महाराजा सिनेमाचे 20 कोटी रुपये बजेट आहे.

55
प्रभासच्या सिनेमाची कमाई

कल्कि 2898 एडी सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास प्रभासच्या सिनेमाने हिंदीत 150 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सिनेमाने एक आठवड्यातील कमाईत काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आतापर्यंत 213 कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनसह फायटर सिनेमा वर्ष 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.

आणखी वाचा : 

नाताशा स्टेनकोविकने पुन्हा हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाची दिली हिंट? व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

अजय देवगणचे 7 धमाकेदार अपकमिंग सिनेमे, पाहा लिस्ट

Share this Photo Gallery
Recommended Photos