अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याआधी अंबानी परिवाराने धूमधडाक्यात लावले 50 जोडप्यांचे लग्न, पाहा PHOTOS

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. याआधी अंबानी परिवाराने 50 जोडप्यांचे सामूहिक पद्धतीने लग्न लावून दिले आहे.

Chanda Mandavkar | Published : Jul 3, 2024 5:41 AM IST / Updated: Jul 12 2024, 04:49 PM IST
17
अंबानी परिवाराने लावले 50 जोडप्यांचे लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी अंबानी परिवाराने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 50 जोडप्यांचे सामूहिक पद्धतीने लग्न लावून दिले आहे. याचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

27
लग्नावेळी 800 मंडळींची उपस्थिती

पालघरमधील जोडप्यांचे लग्न लावून देण्याचा सोहळा अंबानी परिवाराने दिमाखात पार पाडला. या लग्नसोहळ्याला 800 मंडळींनी उपस्थिती लावली होती. लग्न लावून देण्यासह अंबानी परिवाराने जोडप्यांना शुभाशिर्वाद देखील दिले. 

37
नीता अंबानींनी घेतली जोडप्यांची भेट

नीता अंबानी यांनी नवविवाहित जोडप्यांची गळाभेट घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. याशिवाय जोडप्यांना महागडे गिफ्ट देखील अंबानी परिवाराने दिलेत. 

47
अंबानी परिवाराकडून लाख रुपयांचा आहेर

अंबानी परिवाराने सामूहिक पद्धतीने विवाह केलेल्या जोडप्यांना सोने-चांदी आणि एक-एक लाख रुपयांचा आहेर देखील दिला. 

57
गिफ्टमध्ये काय-काय मिळाले?

अंबानी परिवाराने प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, लग्नासाठी अंगठी आणि नथ भेट दिली. याशिवाय चांदीची ज्वेलरी देखील दिली. प्रत्येक नव वधुला एक लाख रुपयांचा चेक देण्यासह काही घरगुती सामान देखील भेट दिली.

67
अंबानी परिवाराने दिले नवविवाहित जोडप्यांना शुभाशिर्वाद

अंबानी परिवारातील मंडळींनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि मुलगी ईशा अंबानीसह आनंद पिरामलही उपस्थितीत होते. 

77
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लग्नसोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी धुमडाक्यात तयारी सुरु आहे. अनंत आणि राधिका येत्या 12 जुलैला लग्नगाठ बांधणार आहे. दोघांचे लग्न रिलायन्स कंपनीच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होणार असून यावेळी जगभरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थिती लावणार आहेत.

आणखी वाचा : 

घरोघरी भांडी घासून आईने वाढवले, आता Bharti Singh एवढ्या CR ची मालकीण

BBOTT3 मधून एक्झिट घेतल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली- मी कायदेशीर पत्नी कृतिका तर…

Read more Photos on
Share this Photo Gallery