इंडियन पॉप सिंगर उषा उथुप यांच्या पतीचे निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Published : Jul 09, 2024, 10:26 AM ISTUpdated : Jul 09, 2024, 10:39 AM IST
Usha Uthup's husband Jani Chacko dies in Kolkata after massive cardiac arrest

सार

Usha Uthup Husband Death : पॉप सिंगर उषा उथुप यांचे पती चानी चाको यांचे निधन झाले आहे. चानी चाको 78 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने उषा उथपु यांच्या पतीचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

Usha Uthup Husband Death : मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद घटना समोर आली आहे. बातम्यांनुसार, इंडियामधील प्रसिद्ध पॉप सिंगर उषा उथुप यांचे पती जानी चाको यांचे निधन झाले आहे. जानी चाको यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने उषा उथुप यांच्या पतीचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. जानी चाको यांची मुलगी अंजलीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर वडिलांसंदर्भातील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हटलेय अंजलीने पोस्टमध्ये?
अंजलीने म्हटले की, आप्पा तुम्ही लवकर निघून गेलात...पण तुम्ही स्टाइलमध्ये आयुष्य जगत होते, तुम्ही जगातील सर्वाधिक सुंदर व्यक्ती होता. आम्ही तुमच्यावर फार प्रेम करतो. एक खरा जेटलमॅन आणि हृदयाने लॉरेंसियन आणि फाइनेस्ट टी टेस्टर होता.

जानी चाको यांचे निधन
बातम्यांनुसार, उषा उथुप यांचे पती जानी चाके यांचे निधन सोमवारी (08 जुलै) कोलकाता येथे झाले. जानी हे घरी टेलिव्हिजन पाहत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली गेली. यानंतर तातडीने जानी यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी जानी यांना मृत घोषित केले. असे सांगितले जात आहे की, उषा यांचे पती टी स्टेटमधील होते. कपलची भेट 70 च्या दशकात झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर लग्न केले. कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जानी यांच्यावर मंगळवारी (09 जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जानी चाको उषा उथुप यांचे दुसरे पती
रिपोर्ट्सनुसार, जानी चाको उषा उथुप यांचे दुसरी पती होते. उषा यांचा पहिला विवाह रामू यांच्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर रामू यांचे निधन झाले. उषा यांच्या करियरबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी काही भाषांमध्ये एकापेक्षा एक दमदार गाणी केली आहेत. उषा यांना भारतातील पहिल्या पॉप सिंगर म्हटले जाते. वर्ष 1969 मध्ये आपल्या करियरची सुरुवात उषा यांनी नाइट क्लब गाण्यांपासून केली होती. याशिवाय उषा यांनी शान, शालिमार, अरमान, वारदात, डिस्को डांन्सर, जानम, माफिका, कभी खुशी कभी गमसारख्या सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.

आणखी वाचा : 

वयाच्या 66 व्या वर्षीही तरुणी दिसतात नीतू सिंह, फिटनेसमागील गुपित काय?

Anant-Radhika Wedding : गृह शांति पूजेला अंबानी आणि मर्चेंटच्या परिवाराची उपस्थिती, पाहा PHOTOS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!