अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबरचा धमाकेदार परफॉर्मेन्स, पाहुण्यांनी लुटला महफिलचा आनंद (Watch Video)

Published : Jul 06, 2024, 09:24 AM ISTUpdated : Jul 12, 2024, 04:47 PM IST
Justin Beiber At Ambani Sangeet Ceremony

सार

Justin Beiber At Ambani Sangeet Ceremony : 5 जुलैला अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने आपल्या धमाकेदार परफॉर्मेन्सने संगीत सोहळ्याची शान वाढवली. याचाच व्हिडीओ पाहूया…

Justin Beiber At Ambani Sangeet Ceremony : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाहसोहळा येत्या 12 जुलैला राधिका मर्चेंटसोबत होणार आहे. याआधी दोघांच्या काही प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. नुकतीच संगीत सेरेमनी 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे पार पडली. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने संगीत सोहळ्याची आपल्या धमाकेदार परफॉर्मेन्सने शान वाढवली. आजही बहुतांशजण जस्टिन बीबरच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. जस्टिन बीबरने संगीत सोहळ्यात परफॉर्म्स दिल्यानंतर 6 जुलैलाच मुंबईहून आपल्या घरी परतण्यासाठी रवाना झाला.

संगीत सेरेमनीला जस्टिन बीबरचा जलवा
अनंत आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीला अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. बॉलिवूड, क्रिकेट क्षेत्र ते राजकीय क्षेत्रातील मंडळींनी संगीत सेरेमनीचा आनंद लुटला. या संगीत सेरेमनीमधील खास आकर्षण जस्टिन बीबरचा धमाकेदार परफॉर्मेन्स ठरला. जस्टिन बीबर मंचावर आल्यानंतर सर्वत्र आनंदाची लाट आल्यासारखे वातावरण झाले होते. जस्टिनने आपल्या एकापेक्षा एक प्रसिद्ध गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन केले. याशिवाय संगीत सेरेमनीवेळी सलमान खान-रणवीर सिंहसोबत अनंत अंबानीनेही ठुमके लावले.

संगीत सेरेमनीला पाहुण्यांची हटके अंदाजात एण्ट्री
अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्याला मोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी सलमान खान, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, वरुण धवन, जाह्नवी कपूर, नव्या नवेली नंदा, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, खुशी कपूर, विद्या बालन, शनाया कपूर, रणवीर सिंह, रितेश देशमुख, दिशा पाटनी, मौनी रॉय, सारा अली खान, इब्राहिम अली खान, पलक तिवारी, शहनाज गिल, एटली कुमार, हार्दिक पंड्या, सोनाली बेंद्रे, केएल राहुल, अथिया शेट्टी, एमएस धोनी, आलिया भट्ट, रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रेटींनी हटके अंदाजात एण्ट्री केल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा : 

Anant-Radhika Sangeet : इशा अंबानींचा संगीत सोहळ्याला जलवा तर दीपिकाची पारंपारिक साडीतील अदा, सर्वाधिक सुंदर व विचित्र आउटफिटमधील कलाकारांचे PHOTOS

Anant-Radhika Sangeet : इशा अंबानींचा संगीत सोहळ्याला जलवा तर दीपिकाची पारंपारिक साडीतील अदा, सर्वाधिक सुंदर व विचित्र आउटफिटमधील कलाकारांचे PHOTOS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!