Published : Jun 25, 2025, 03:40 PM ISTUpdated : Jun 25, 2025, 03:46 PM IST
Mumbai : मराठी चित्रपटसृष्टीतील दादा कोंडके हे नाव जितकं लोकप्रिय, तितकंच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींनी वादग्रस्त ठरलं. त्यांच्या चित्रपटांमधील लोकप्रिय जोडीदार उषा चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या जवळीकतेची चर्चा वर्षानुवर्षे रंगली.
मराठी चित्रपटसृष्टीतील करिष्माईक नाऊ ‘दादा कोंडके’ आणि त्यांची लोकप्रिय सहकलाकार उषा चव्हाण यांची जोडी ७०-८०च्या दशकात सुपरहिट ठरली. मात्र पडद्यामागे दोघांमध्ये गोडनात्याऐवजी कटुता निर्माण झाली, असा गौप्यस्फोट खुद्द उषा चव्हाण यांनी केला आहे.
25
इंडस्ट्रीत अविवाहित असल्यासारखे वागायचे
दादा कोंडके – ज्या काळात प्रेक्षकांनी त्यांना अनभिषिक्त कॉमेडी किंग म्हणून डोक्यावर घेतलं – ते विवाहित असूनही इंडस्ट्रीत ‘अविवाहित’ असल्यासारखं वागत, असा आरोप उषा चव्हाण यांनी केला होता. दादांना त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण उषा यांनी स्पष्ट नकार दिला. हा नकार दादांना न पटल्यामुळे, त्यांनी ‘सूड’ उगवल्याचा दावा उषांनी एका ब्लॉगमधून केला होता.
35
'एकटा जीव' आत्मचरित्रातून खुलासे
उषा चव्हाण सांगतात, दादांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात तिच्यासह इतर कलाकारांविषयी अप्रिय गोष्टी लिहिल्या गेल्या. त्या पुस्तकामुळे आपली बदनामी झाली, मानसिक त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे वाद वाढल्यानंतर या पुस्तकावर बंदीही घालण्यात आली.
चित्रपट करिअरकडे वळल्यास, उषा चव्हाण यांना झपाटून दिलेली प्रसिद्धी दादांच्या ‘सोंगाड्या’ सिनेमामुळेच मिळाली. त्यानंतर ‘गनिमी कावा’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘राम राम गंगाराम’ यांसारख्या हिट चित्रपटांनी त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
55
दादा कोंडकेंमुळे उषा चव्हाणांना त्रास?
आज अभिनयापासून दूर असल्या, तरी दादा कोंडकेंच्या त्या कथित सूडाने उषा चव्हाण यांच्या आयुष्यात कटुप्रसंग निर्माण केला; तरीही त्यांच्या कलाकृतींचा ठसा चिरंतन राहणार, हे मात्र नक्की.