Sonakshi Sinha ची पतीसोबतच्या रोमँटिक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. या फंक्शनला नुकचेच लग्न झालेले बॉलिवूडमधील कपल सोनाक्षी आणि जहीरही आला होता.
अनंत अंबानी-राधिका मर्चेंट शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला पार पडला. या शुभ आशीर्वाद सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कपलला आशीर्वाद दिले. याशिवाय राजकीय नेतेमंडळी ते अनेक सेलिब्रेंटीनी सोहळ्यासाठी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
26
सोनाक्षी आणि जहीरची शुभ आशीर्वाद सेरेमनीला उपस्थिती
अनंत आणि राधिकाच्या शुभ आशीर्वाद सेरेमनीला बॉलिवूडमध्ये नुकतेच लग्न झालेले कपल सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल पोहोचले होते.
36
सोनाक्षीची पतीसोबतच्या रोमँटिक फोटोंची चर्चा
सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रावर पती जहीर इक्बालसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा केली जात आहे.
46
सोनाक्षी आणि जहीर लग्नानंतर आनंदित
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लग्नानंतर एकमेकांसोबत आनंदित असल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे. या दोघांनी 23 जूनला एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
56
जहीर इक्बालची इंस्टाग्राम स्टोरी
जहीर इक्बालने अनंत-राधिकाच्या सोहळ्यातील एक स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये जहीर पत्नी सोनाक्षीसह संजय दत्त आणि सलमान खानसोबत पोज देताना दिसून येत आहे.
66
सोनाक्षीचा ट्रेडिशनल लूक
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी सोनाक्षीने ट्रेडिशन लूक केला होता. सोनाक्षीने लाल रंगातील अनारकली सूट परिधान केला होता. यावर सिंदूर, गोल्डन हेव्ही इअरिंग्सह मिनिमल मेकअपने लूक पूर्ण केला होता.