Anant-Radhika Wedding : अंबानी परिवाराच्या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटी ते परदेशी पाहुण्यांचे आगमन, पाहा Guest Looks फोटोज

Published : Jul 12, 2024, 06:10 PM ISTUpdated : Jul 12, 2024, 06:29 PM IST

Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाच्या शाही सोहळ्यासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. रात्री 8 वाजल्यापासून कपलच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पाहुण्यांनी दमदार एण्ट्री करत पापाराझींच्या समोर पोज दिल्याचे फोटो समोर आलेत. 

PREV
112
मिजान जाफरीचा लूक

जावेद जाफरी यांचा मुलगा आणि अभिनेता मिजान जाफरीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे. यावेळी मिजानने खास लाल रंगातील शिमर कुर्ता आणि पटियाल पायजमा परिधान केला आहे. कुर्त्यावर DDC अक्षरांची खास डिझाइनही करण्यात आली आहे. 

212
अनन्या पांडेचा खास लेहेंगा

अभिनेत्री अनन्या पांडेने पिवळ्या आणि गोल्डन रंगातील डिझाइन असणारा खास लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावरील ब्लाऊजवर अनन्याने Anant's Brigade अशी कस्टमाइज डिझाइन करुन घेतली आहे. 

312
राजकुमार राव आणि पत्रलेखा

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी राजकुमार राव आणि पत्रलेखाने उपस्थिती लावली आहे. पत्रलेखाने लाल रंगातील लेहेंगा परिधान केला आहे. यामध्ये पत्रलेखा अत्यंत सुंदर दिसतेय. 

412
डब्लूडब्लूई जॉन सीना

इब्लूडब्लूईमधील जॉन सीनाने भारतीय पोषाखात पापाराझींसमोर पोज दिल्या आहेत. याशिवाय आपली सिग्नेचर पोजही जॉन सीनाने दिली आहे. 

512
जॅकी श्रॉफचा लूक

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पारंपारिक पोषाखात अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी एण्ट्री केली आहे. जॅकी श्रॉफ यांनी पांढऱ्या रंगातील धोती घातल्याचे दिसून येत आहे. 

612
खुशी कपूरचा मनमोहक अंदाज

हिरव्या रंगातील लेहेंग्यावर खुशी कपूरचा मनमोहक अंदाज दिसतोय. अगदी सिंपल आणि सोबर लूक खुशीने लग्नसोहळयासाठी केला आहे. 

712
सारा अली खान आणि अब्राहम खानची एण्ट्री

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी सारा अली खानने पेस्टल रंगातील लेहेंगा परिधान केला आहे. यामध्ये सारा अतिशय सुंदर दिसतेय. तर अब्राहमने काळ्या रंगातील सूट परिधान केला आहे. 

812
अर्जुन कपूरचा कूल स्वॅग

अर्जुन कपूरने कूल स्वॅगमध्ये अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी एण्ट्री केली आहे. याशिवाय अर्जुनच्या कुर्त्यावर मेरे यार की शादी असे लाल रंगात डिझाइनही करण्यात आले आहे. 

912
विधू विनोद चोप्रांची परिवारासोबत उपस्थिती

अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी विधू विनोद चोप्रांनी परिवारासोबत एण्ट्री केली. 

1012
गायक अनु मलिक यांची परिवारासोबत एण्ट्री

गायक अनु मलिकही परिवारासोबत अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी पोहोचले आहेत. 

1112
संजय दत्त आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर

संजय दत्तने डिझाइनर शेरवानी परिधान करत अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी एण्ट्री केली. तर दिग्दर्शक मधुर भांडाकर यांचा सिंपल आणि सोबर लूक दिसला. 

1212
क्यूट कपल जेनेलिया आणि रितेशचा लूक

बॉलिवूडमधील क्यूट कपल जेनेलिया आणि रितेश देशमुखही अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी पोहोचला आहे. 

आणखी वाचा :

Anant Ambani-Radhika Merchant च्या लग्नसोहळ्याला सुरुवात, अंबानी परिवाराची वेन्यूच्या येथे शाही एण्ट्री, See Photos

4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक

Recommended Stories