सोनाक्षी सिन्हा विक्री करतेय वांद्रे येथील 25CR चे घर, धर्म ठरलेय कारण?

Published : Aug 21, 2024, 03:23 PM ISTUpdated : Aug 21, 2024, 03:25 PM IST
sonakshi sinha apartment for sale

सार

Sonakshi Sinha House for Sale : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपले वांद्रे येथील आलिशान घर विक्रीसाठी काढले आहे. याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Sonakshi Sinha House for Sale : बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी आणि जहीरचे नुकतेच लग्न झाले. या दोघांनी वांद्रे येथील घरीच रजिस्टर पद्धतीने एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. दरम्यान, परिवारात सुरू असणाऱ्या मतभेदामुळे मीडियाला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवण्यात आले होते. पण आता हळूहळू गोष्टी उलगडत आहे. आता सोनाक्षी सिन्हाने तिचे वांद्रे येथील घर विक्रीसाठी काढले आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनाक्षीचे घर 25CR ला विक्रीसाठी उपलब्ध
एका रियल इस्टेट कंपनीने आलिशान घराच्या विक्रीसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याचे दृष्य दाखवले आहे. याशिवाय सोनाक्षीने व्हिडीओवर कमेंट देखील केली आहे. यामुळे कळते की, सोनाक्षीने ज्या घरात लग्न केले होते तेच घर आता विक्रीसाठी काढले आहे.

घरातील खास गोष्टी
मुंबईतील वांद्रे येथे असणारे घर जवळजवळ 4200 स्क्वेअर फूटवर विस्तारलेले आहे. यामध्ये पाच बेडरुम होऊ शकतात. पण घरात केवळ दोनच बेडरुम आहेत. घर सी-फेसिंग असून दोन मोठ्या बाल्कनी देखील आहेत. येथून समुद्राचा नजारा दिसतो. या घरात खासगी लिफ्ट, जिमसह काही अत्याधुनिक सुविधा देखील आहेत. घराची किंमत 25 कोटी रुपये सांगितली जात आहे. याशिवाय घराच्या इंटिरियरसाठी 5 कोटी रुपयांचा देखील खर्च करण्यात आला आहे. घराची किंमत ऐकून काहींनी म्हटले की, केवळ दोन खोल्यांसाठी ठेवण्यात आलेली किंमत खूपच आहे.

का विक्री करतेय घर?
सोनाक्षी सिन्हा ज्या घरात लग्नगाठ बांधील ते का विक्री करतेय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. असे सांगितले जात आहे की, नवऱ्याची जात वेगळी असल्याने आधीच घरात वाद सुरु आहेत. यामुळेच नेटकऱ्यांनी असा तर्क लावला आहे की, घरातील वादामुळेच घर विक्रीसाठी काढले असावे.

आणखी वाचा : 

सलमान खानच्या 'Tere Naam' सिनेमातील मधील 'निर्जरा' सध्या काय करते?

विद्या बालनसोबत काम का करत नाही? खुद्द सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केला खुलासा

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!