सलमान खानची Race 4 सिनेमातून एक्झिट, समोर आले हैराण करणारे कारण

Published : Aug 20, 2024, 02:27 PM ISTUpdated : Aug 20, 2024, 02:28 PM IST
salman khan out from race 4 saif ali khan return in movie again

सार

Salman Khan Out From Race 4 : ‘रेस-4’ सिनेमातून सलमान खानची एक्झिट झाल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. निर्मात्यांनी सलमान खानला बाजूला करत सैफ अली खानला सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Salman Khan Out From Race 4 :'रेस' फ्रेंचायजी बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध थ्रिलर सीरिजपैकी एक आहे. याची सुरुवात वर्ष 2008 मध्ये अब्बास मस्तान यांच्या दिग्दर्शनाखाली झाली होती. यामध्ये सैफ अली खानने मुख्य भूमिका साकारली होती. सैफने वर्ष 2013 मध्ये रेस सिनेमाच्या सिक्वलमध्येही काम केले होते. दरम्यान, वर्ष 2018 मध्ये सलमान खानने 'रेस-3' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. याचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले होते. सलमानसह सिनेमात अनिल कपूर, डेजी शाह, जॅकलीन फर्नांडीस, बॉबी देओन आणि साकिब सलीम असे कलाकार झळकले होत. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला. आता 'रेस-4' सिनेमासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. सिनेमातून सलमानला बाहेर काढले असून सैफ अली खानची एन्ट्री होणार आहे.

रेस-4 मध्ये झळकणार सैफ अली खान
बहुप्रतिक्षीत रेस-4 सिनेमाचे एक अपडेट समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की, निर्माते रमेश तौरानी रेस-4 सिनेमा काढणार आहेत. दरम्यान, रेस-4 मध्ये सलमान खान नसमार आहे. पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान रेस फ्रेंचायजीमध्ये पुन्हा येणार आहे. प्रोजेक्टसंबंधित एका सूत्राने माहिती देत म्हटले की, सैफ काही काळापासून सिनेमासंदर्भात रमेश तौरानीसोबत चर्चा करत आहे.

रेस-4 सिनेमासाठी सैफ उत्सुक
रेस-4 सिनेमातून पुन्हा एकदा सैफ अली खान कमबॅक करणार आहे. सिनेमाचे शूटिंग यंदाच्याच वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या कथेवर काम सुरु आहे. दरम्यान, रेस-4 सिनेमाचा प्लॉट काय असणार यावर आधीच निर्णय घेण्यात आला आबे. सैफसोबत उत्तम स्टारकास्टही सिनेमात झळकणार आहे. निर्माते अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमासाठी एका नव्या दिग्दर्शकांच्या शोधात आहे.

सैफच्या कामाबद्दल थोडक्यात
सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तेलुगु सिनेमा 'देवरा' च्या पहिल्या भागात दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केले आहे. सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सलमान खानबद्दल बोलायचे झाल्यास तो एआर मुरुगादास यांचा सिनेमा 'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानासोबत झळकणार आहे. हा सिनेमा येत्या 2025 रोजी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. सलमान खान साजिद नाडियाडवाला यांच्या 'किक-2' सिनेमातही दिसणार आहे.

आणखी वाचा : 

सिनेसृष्टीचा खरा चेहरा उघडकीस, HEMA समितीच्या रिपोर्ट्समधून धक्कादायक खुलासे

श्रेयस तळपदेच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या, अभिनेत्याने पोस्ट करत म्हटले...

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?