विद्या बालनसोबत काम का करत नाही? खुद्द सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केला खुलासा

Published : Aug 21, 2024, 10:36 AM ISTUpdated : Aug 21, 2024, 10:37 AM IST
Vidya Balan Husband Siddharth Roy Kapoor

सार

Siddharth Roy Kapur on Work Life : विद्या बालनचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी पत्नीसोबत काम का करत नाही याचा खुलासा केला होता. खरंतर, सिद्धार्थ रॉय कपूर निर्माते असून त्यांनी काही सुपरहिट सिनेमे तयार केले आहेत.

Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालनच्या लूकची नेहमीच लाइमलाइटमध्ये चर्चा होत राहते. सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसून येणाऱ्या विद्याला अनेकदा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत स्पॉट केले जाते. सिद्धार्थ रॉय कपूर निर्माते असून त्यांनी काही सुपरहिट सिनेमे तयार केले आहेत. सिद्धार्थ रॉय कपूरच्या घरातच तीन कलाकार आहेत. एक म्हणजे पत्नी विद्या बालन, भाऊ कुणाल आणि आदित्य रॉय कपूर. हे तिघेही सिनेसृष्टीचा हिस्सा असले तरीही सिद्धार्थ रॉय कपूर कधीच यांच्यासोबत काम करत नाही. यामागील कारण देखील सिद्धार्थ रॉय कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सांगितले कारण
वर्ष 2017 मध्ये एका मुलाखतीत सिद्धार्थ रॉय कपूर यांनी परिवारासोबत काम न करण्याचे कारण सांगितले आहे. त्यावेळी सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले होते की, हे सर्वजण माझ्या परिवाराचा हिस्सा आहेत. पण आम्ही ठरवले आहे की, नेहमीच खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवू. ही टेक्निक आमच्यासाठी उत्तम काम करते.

भावाकडून पाठिंबा
सिद्धार्थने आपले दोन्ही भाऊ कुणाल आणि आदित्यबद्दल बोलताना म्हटले होते की, आम्ही सर्वजण आपापल्या मार्गाने जात आहोत. पण जे काही करतो तेव्हा एकमेकांना पाठिंबा नक्कीच देतो.

सोशल मीडियावर सक्रिय असते विद्या
विद्या बालन आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच संवाद साधत असते. अभिनेत्री रिल्स, फोटो शेअर करत स्वत: बद्दलचे अपडेट्स देत असते. नुकतीच एक रिल विद्या बालनने तयार केली होती. त्यामध्ये कपिल शर्माच्या प्रसिद्ध विधानावर व्हिडीओ शूट केला होता. ही रिल सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. विद्या बालन नेहमीच ट्रेन्डींग टॉपिकवर रिल्स तयार करत असते.

विद्या बालनच्या कामाबद्दल
विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री प्रतीक गांधीसोबत 'दो और दो प्यार' सिनेमातून झळकली होती. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

आणखी वाचा : 

सलमान खानची Race 4 सिनेमातून एक्झिट, समोर आले हैराण करणारे कारण

सिनेसृष्टीचा खरा चेहरा उघडकीस, HEMA समितीच्या रिपोर्ट्समधून धक्कादायक खुलासे

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?