Son Of Sardaar 2 च्या निर्मात्यांनी विजय राजला सिनेमातून केले OUT, वाचा कारण

Son Of Sardaar 2 : अजय देवगणचा सन ऑफ सरदार-2 सिनेमातून संजय दत्तनंतर आता एका मोठ्या कलाकाराला सिनेमातून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

Son Of Sardaar 2 Updates : बॉलिवूडमधील अभिनेता अजय देवगणचा सन ऑफ सरदार-2 सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे शूटिंग युकेमध्ये सुरु आहे. अशातच सिनेमासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी विजय राज याला बाहेर काढले आहे. यामागील कारणही सिनेमाचे को-प्रोड्यूसर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले आहे.

विजय राजला सिनेमातून बाहेर काढण्यामागील कारण
सन ऑफ सरदार-2 सिनेमाचे को-प्रोड्यूसर कुमार मंगत पाठक यांनी म्हटले की, विजय राज यांना त्यांच्या सेटवरील वागणुकीमुळे बाहेर काढले आहे. विजय राज यांना मोठी खोली, वॅनिटी वॅन अशा काही गोष्टींची मागणी केली होती. याशिवाय विजय राज यांच्या स्पॉट बॉयला 20 हजार रुपये प्रति महिन्यापेक्षा अधिक पेमेंट दिले जात होते. जे एखाद्या मोठ्या कलाकाराला दिल्या जाणाऱ्या पेमेंटपेक्षा अधिक आहे. युके एक महागडे ठिकाण असून तेथे शूटिंगवेळी सर्वांना उत्तम राहण्याची सोय केली होती. विजय राज यांनी प्रीमियम सूइट्सची मागणी केली होती. खरंतर, विजय राज यांना सिनेमासाठी लागणारा खर्च समजावून सांगत होतो तरीही त्यांनी समजून घेण्यास नकार दिला.

विजय राज यांनी संतप्त होत असेही म्हटले की, मी तुमच्याकडे सिनेमासाठी आलो नव्हतो. तुम्हीच मला विचारले होते. विजय राज यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचेही को-प्रोड्यूसर यांनी सांगितले. पण विजय यांचे वेळोवेळी वागणे बिघडत गेले. अशा सर्व गोष्टींमुळेच विजय राज यांना सिनेमातून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विजय राज यांनी दिले स्पष्टीकरण
विजय राज यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मी ट्रायलसाठी लोकेशनवर नेहमीच आधी पोहोचायचो. त्यावेळी अजय देगवण यांच्याशी भेट घडली नाही. कारण अजय व्यस्त होता. यामुळेच येथील काही मित्रांना भेटत होतो. काही काळानंतर मिस्टर कुमार मंगत माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही सिनेमातून निघून जा. आम्ही तुम्हाला सिनेमातून काढतोय. माझी एकच चूक झाली मी अजय देवगणला अभिवादन केले नाही. सेटवर पोहोचण्याच्या अर्धा तास आधी मला सिनेमातून काढून टाकले.

विजय यांनी पुढे म्हटले की, निर्मात्यांनी सर्वकाही चुकीचे सांगितले आहे. मला एक लहान खोली राहण्यासाठी दिली होती. ज्यामध्ये फिरण्यासाठीही पुरेशी जागा नव्हती. मी दररोज सकाळी योगा करतो. अशातच खोलीत पुरेशी जागा हवी होती. इंडस्ट्रीमध्ये मला 26 वर्षे झाली आहेत. यामुळे पुरेश्या खोलीची मागणी करू शकत नाही का? यावर कुमार मंगत पाठक यांनी म्हटले की, अनप्रोफेशनल वागणूक आम्ही खपवून घेणार नाही. एक उत्तम बाब अशी की, सिनेमाचे शूटिंग सुरु होण्याआधी मला त्यांनी काढले.

आणखी वाचा : 

प्रभासचा Kalki 2898 AD सिनेमा OTT वर प्रेक्षकांना कुठे आणि कधी पाहता येणार?

गोपी बहूच्या घरी पाळणा हलणार, अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गोड बातमी

Share this article