प्रभासचा Kalki 2898 AD सिनेमा OTT वर प्रेक्षकांना कुठे आणि कधी पाहता येणार?

Kalki 2898 AD OTT Release : प्रभास स्टारर ब्लॉकबस्टर सिनेमा कल्कि 2898 एडी सिनेमाने जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याशिवाय सिनेमाने केवळ भारतात 650 कोटींच्या आसपास कलेक्शन केले होते. आता सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.

Kalki 2898 AD OTT Release : कल्कि 2898 एडी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमाने जगभरातही तगडी कमाई केली आहे. भारतात प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 650 कोटींच्या आसपास कमाई केली होती. सिनेमाच दीपिका पादुकोण, प्रभाससह अमिताभ बच्चन, कमल हसन सारखे तगडी स्टारकास्ट झळकली आहे. एवढेच नव्हे सिनेमाने बड्या कलाकारांच्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेकही केले आहेत.

जून महिन्यात रिलीज झाला होता सिनेमा
कल्कि 2898 एडी सिनेमा जून महिन्यात रिलीज झाला होता. या सिनेमाची रिलीज आधी आणि नंतर जोरदार चर्चा झाली. याशिवाय प्रेक्षकांनीही सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला. सिनेमाचे रिलीजच्या दिवशीच तब्बल 114 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

सिनेमा ओटीटीवर पाहता येणार
कल्कि 2898 एडी सिनेमा हिंदी भाषेत नेटफ्लिक्स आणि दक्षिण भारतातील भाषांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार असल्याचे आधीच ठरले होते. येत्या 22 ऑगस्टपासून प्रेक्षकांना सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ यांच्याकडून देण्यात आली आहे.

ओटीटीवर रिलीजचा प्लॅन नव्हता
सिनेमा केवळ सिनेमागृहांमध्येच दाखवला जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे ओटीटी रिलीज टाळले जात होते. कल्कि 2898 एडी सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने ओटीटीवर दोन महिन्यानंतर दाखवला जाईल असा रिपोर्ट तेलुगु मीडियाकडून देण्यात आला होता. वैजयंती मूव्हीच बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कल्कि 2898 एडी सिनेमाची निर्मिती अश्विनी दत्त, स्वप्ना दत्त आणि प्रियंका दत्त यांनी केली आहे.

आणखी वाचा : 

पाणी विकून आयुष्य जगायचा ऋषभ शेट्टी, आज राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी

1200CR ची संपत्ती आणि बरचं काही...असे आहे सैफचे नवाबी आयुष्य

Share this article