Stree 2 सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, वाचा पहिल्याच दिवसाची कमाई

Published : Aug 16, 2024, 09:20 AM IST
Stree 2

सार

Stree 2 Day 1 Collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्री-2 सिनेमा नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच स्री-2 सिनेमाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

Stree 2 Box Office Collection Day 1 : ‘स्री-2’ सिनेमाच रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. अशातच गुरुवारी (15 ऑगस्ट) सिनेमा प्रदर्शित झाला. पण निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी सिनेमाचा शो 14 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू केले. हॉरर-कॉमेडी कथा असणाऱ्या स्री-2 सिनेमाने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नव्हे स्री-2 सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या स्री-2 सिनेमाची टक्कर दोन मेगास्टारसोबत झाली. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा देखील सिनेमा स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आला. पण स्री-2 सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका वाजला आहे. सिनेमाच्या केवळ शो मुळे स्री-2 ने तब्बल 8.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

स्री-2 सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई
सॅकनिल्कच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, स्री-2 सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी 46 कोटी रुपयांची कमाई केली. ही आकडेवारी सुरुवातीची असून यामध्ये थोडा फेरफार असू शकतो. यासोबतच्या पेड प्रीव्हू शो मिळून स्री-2 सिनेमाने 54.35 कोटींची शानदार ओपनिंग केली आहे. टॉप 3 ग्रॉस इंडिया ओपनिंग सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास स्री-2 सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 3 ग्रॉस इंडिया ओपनिंग सिनेमे

  • कल्कि 2898 एडी - 114 कोटी रुपये
  • स्री - 54 कोटी रुपये
  • गुंटूर कारम - 48.7 कोटी रुपये

याशिवाय स्री-2 सिनेमाने सलमान खान आणि शाहरुख खानच्या काही सिनेमांना पहिल्याच दिवसाच्या कमाईत मागे टाकले आहे. स्री-2 सिनेमा हिंदी भाषेत पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा टॉप-10 सिनेमांच्या लिस्टमध्ये सहभागी झाला आहे.

सिनेमाचे बजेट आणि कलाकारांची फी
स्री-2 सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली असून विकेंडपर्यंत 100 कोटींचे कलेक्शन होण्याचा अंदाज आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी सिनेमा तयार करण्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यापैकी 5 कोटी रुपयांची फी अभिनेत्री श्रद्धा कपूरने वसूल केली आहे. याशिवाय राजकुमार रावला सिनेमासाठी 6 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्री’ सिनेमासाठी निर्मात्यांनी 30 कोटी रुपयांचा खर्च केला होता. आता 6 वर्षांनी तयार केलेल्या स्री-2 सिनेमासाठी निर्मात्यांनी दुप्पट बजेट लावले आहे. सिनेमाच्या पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या सिनेमाने जगभरात 182 कोटी रुपयांचे कलेक्शन केलेहोते. केवळ भारतातच स्री सिनेमाने 167 कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : 

KBC 16 च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन यांनी वसूल केली एवढी Fees

श्रद्धा कपूरला Stree-2 नव्हे रणबीरसोबतच्या सिनेमासाठी मिळालीय सर्वाधिक फी

PREV

Recommended Stories

Aishwarya Rai Paris Fashion Week : ऐश्वर्या रायचा पॅरिस फॅशन वीकमधील रॉयल ब्लॅक लूक, व्हिडीओ पाहाच
Amitabh Bachchan Injury: 'केबीसी 18' च्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी, गुडघ्याला लागला मार