गोपी बहूच्या घरी पाळणा हलणार, अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गोड बातमी
Entertainment Aug 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
आई होणार गोपी बहू
साथ निभाना साथिया मालिकेतील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. याची गुडन्यूज अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे.
Image credits: Isntagram
Marathi
चाहत्यांना दिली गोड बातमी
देवोलीनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय आई होणार असल्याच्या प्रवासाचा आनंद घेत असल्याचेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
Image credits: Instagram
Marathi
पतीसोबतचा फोटो शेअर
देवोलीनाने पती शाहनवाज शेख याच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्या बाळाचे टी-शर्ट हातात अभिनेत्रीने घेतल्याचे दिसून येत आहे.
Image credits: Instagram
Marathi
पंचामृत अनुष्ठानवेळी दिसली खास मंडळी
देवोलीनाच्या पंचामृत अनुष्ठानवेळी घरातील मंडळींसह खास मित्रमैत्रीणींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
Image credits: Instagram
Marathi
देवोलीनीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा
देवोलीना भट्टाचार्जीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होत्या. अशातच अभिनेत्रीने गुड न्यूज देत अखेर चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Image credits: Instagram
Marathi
वर्ष 2022 मध्ये झाला होता विवाह
हिरव्या रंगातील साडीत देवोलीना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. वर्ष 2022 मध्ये देवोलीना आमि शाहनवाज यांचा विवाह झाला होता.
Image credits: Instagram
Marathi
गोपी बहूच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी
देवोलीना भट्टाचार्जीला साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहूच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. याशिवाय देवोलीनाने काही मालिकांमध्ये कामही केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
देवोलीनाने चाहत्यांसोबत प्रेग्नेंसीची न्यूज शेअर केल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.