श्रुती हसनचे शांतनु हजारिकासोबत मोडले नाते? चार वर्षे Live-in-relationship मध्ये होती अभिनेत्री

Published : Apr 27, 2024, 01:44 PM ISTUpdated : Apr 27, 2024, 03:37 PM IST
Shruti Haasan-Santanu Hazarika Part Ways After Dating For Four Years

सार

Entertainment : अभिनेत्री श्रुती हसन सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा लॉन्ग टर्म पार्टनर शांतनु हजारिकासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

Entertainment : श्रुती हसन (Shruti Hassan) साउथ ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पण श्रुती सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अशातच श्रुती हसनचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड शांतुन हजारिकासोबत (Santanu Hazarika) ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

श्रुती हसन आणि शांतुनेचा ब्रेकअप रिपोर्ट्सनुसार, श्रुती हसन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हजारिका यांचे नाते मोडले आहे. या दोघांनी आपले मार्ग एकमेकांपासून वेगळे केले आहेत. एवढेच नव्हे श्रुती आणि शांतनुने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे.

श्रुती हसन आमि शांतनुचे ब्रेकअप
 रिपोर्ट्सनुसार, श्रुती आणि शांतनु काही खासगी समस्यांचा सामना करत होते. यामुळेच दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा. या चर्चांवर अद्याप दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. याव्यतिरिक्त श्रुतीने सोशल मीडियावर केलेल्या क्रिप्टक पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. या पोस्टमध्ये श्रुतीने लिहिले होते की, "हा एक वेड्यासारखा प्रवास होता, स्वत:बद्दल आणि लोकांबद्दल खूप काही शिका."

दीर्घकाळापासून श्रुती आणि शांतनु करत होते एकमेकांना डेट
श्रुती आणि शांतनु दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्येही राहत होते. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत स्पॉटही करण्यात आले आहे. शांतनु एक प्रसिद्ध डुडल आणि मल्टीडिस्पलनरी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. याशिवाय शांतनुने रफ्तार, डिवाइनसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे.

श्रुती आणि शांतनुच्या लग्नाच्या अफवा
यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला सोशल मीडियावर श्रुती आणि शांतुनच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. पण नंतर श्रुतीने इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये स्पष्ट केले की, माझा विवाह झालेला नाही.

श्रुती हसनच्या कामाबद्दल थोडक्यात…
श्रुती हसनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने 'सालार' सिनेमात झळकली होती. सालारमध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

आणखी वाचा : 

अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील 8 फ्लॉप चित्रपटे कोणती ? जाणून घ्या

'ड्रीम गर्ल 3'मधून अनन्या पांडेचा पत्ता कट ? दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीची लागली वर्णी ?

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!