Salman Khan Shooting Case : दोन आरोपींना पंजाब मधून अटक, आज न्यायालयात करणार हजर

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. क्राईम ब्रँचने दावा केलाय की, पकडलेल्या दोन तरुणांनी सलमानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्यांना पिस्तुल उपलब्ध करुन दिलं होती.

Ankita Kothare | Published : Apr 26, 2024 7:13 AM IST

बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. क्राईम ब्रँचने दावा केलाय की, पकडलेल्या दोन तरुणांनी सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्यांना पिस्तुल उपलब्ध करुन दिलं होती.

गुरुवारी पकडलेल्या आरोपींनीच मुख्य आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना ४० राऊंड गोळ्या आणि पिस्तुल दिल्याचा दावा केला जातोय. या दोघांना पंजाबमधून अटक केली आहे. तर तिकडे सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं होतं. क्राईम ब्रँचने कोर्टात सांगितलं की, गोळीबाराची घटना घडल्यानंतर या दोघांनी आपले कपडे तीनवेळा बदलले आणि कोणाला ओळखू येऊ नये म्हणून वेश बदलण्याचा प्रयत्न केला.

क्राईम ब्रांचचे म्हणणे काय :

मुंबई क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, गोळीबार होण्यापूर्वी शूटर्सनी सलमानच्या घरी चार वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सलमानचे फार्महाऊस देखील बाहेर काढले होते, गुन्हे शाखेने माहिती दिली की, अभिनेता अनेक दिवसांपासून त्याच्या फार्महाऊसला भेट देत नसल्यामुळे, त्यांनी वांद्रे येथील त्याच्या आलिशान गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याची योजना आखली होती.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई क्राईम ब्रँचने आरोपींकडून त्यांच्या अटकेच्या वेळी एक तुटलेला मोबाईल हँडसेट जप्त केला असून त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त फोन होते. ते इतर फोनचाही शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. सुरतच्या तापी नदीतून चार मॅगझिन आणि १७ राउंडसह दुसरे पिस्तूल जप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली.

14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चार राऊंड गोळीबार केला आणि पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी स्पोर्ट्स कॅप आणि बॅकपॅक घेऊन जाताना दिसले.रिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पोलीस पथक आरोपींना घेऊन गुरूवारी रात्री उशीरा मुंबईत दाखल झाले. 

आणखी वाचा :

फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचेसचे स्ट्रीम केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स

दोन लग्न करूनही अमीर खान करणार तिसरे लग्न, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

Share this article