SHOCKING: सुपरस्टार विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारावेळी थलापति विजयला चप्पल फेकून मारली? Viral होतोयं व्हिडिओ

Published : Dec 29, 2023, 06:20 PM ISTUpdated : Dec 29, 2023, 06:34 PM IST
thalapathy vijay

सार

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सुपरस्टार विजयकांत यांच्या अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या थलापति विजयला एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकून मारल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Thalapathy Vijay Attacked at Vijayakanth Funeral : दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेता विजयकांत (Vijayakanth) यांचे गुरूवारी (28 डिसेंबर, 2023) निधन झाले. विजयकांत यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली गेली. शुक्रवारी (29 डिसेंबर, 2023) विजयकांत यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वियजकांत यांच्या चाहत्यांसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार देखील उपस्थितीत होते.

विजयकांत यांच्या अंत्यंसंस्कारावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay) याला एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकून मारल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय विजय हा लोकांच्या गर्दीत अडकला गेल्याचेही व्हिडिओमध्ये दिसतेय.

थलापतिवर झालेल्या हल्लामुळे चाहते नाराज
थलापति विजयवर झालेल्या हल्ल्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियामध्ये संपात व्यक्त केला जात आहे. एका चाहत्याने म्हटले की, "थलापति विजयसोबत घडलेल्या प्रकाराची निंदा करतो. कोणीही असो, तो आपल्या येथे आल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे."

दुसऱ्याने लिहिले की, "अशा प्रकारे करण्यात आलेल्या सुपरस्टारचा अपमान सहन केला जाणार नाही." तर तिसरा म्हणाला, "थलापतिसोबत ज्या कोणी व्यक्तीने हे केलेयं त्याला कठोर शिक्षा मिळावी." अशा वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया थलापतिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियामध्ये व्यक्त केल्या जात आहेत.

विजयकांत यांचे निधन
दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार आणि राजकीय नेते विजयकांत यांचे निधन 28 डिसेंबर (2023) रोजी झाले. रिपोर्ट्सनुसार, विजयकांत हे न्यूमोनिया आजाराचा सामना करत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी विजयकांत यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले पण त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा: 

DMDK Vijayakanth Passed Away : DMDKचे संस्थापक विजयकांत यांचे निधन, कोरोनाचा झाला होता संसर्ग

सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटचे हे आहे रहस्य

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!